आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:सेनगाव येथे घर मालकीणीने किरायादाराचा अल्पवयीन मुलगा पळविला, मुलाच्या वडिलांची सेनगाव पोलिस ठाण्यात तक्रार

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव येथे घर मालकीणीने किरायादाराचा अल्पवयीन मुलगा पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी त्या मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात शनिवारी (ता. १८) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथील गवंडी काम करणारे व्यक्ती मागील दोन वर्षापासून सेनगाव येथे राहून गवंडी काम करत उदरनिर्वाह करतात. त्यांना १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा देखील आहे. दोन वर्षात घर मालकिणीचे त्यांच्या मुलासोबत प्रेम संबंध जुळले मात्र याची कानोकान खबर ही कोणाला लागली नाही.

दरम्यान  (ता. १२ )जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तो  मुलगा अचानक बेपत्ता झाला. रात्री उशिरा मुलगा घरी आला नसल्याने त्याच्या कुटूंबियांनी  शोधाशोध सुरू केली मात्र मुलगा कुठेही आढळून आला नाही. त्यांनी सर्व नातेवाईकांकडे मुलाचा शोध सुरू केला . मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. तर याच दरम्यान घर मालकीण देखील घरी नसल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी मुलांसोबतच घरमालकिणीची देखील माहिती काढण्यास सुरुवात केली.

त्यानंतर दोन दिवसापुर्वी संबंधित घरमालकीण व मुलाने त्याच्या मामाच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आम्ही बाहेर असल्याचे कळवले. त्यामुळे घरमालकीणीने मुलाला पळवल्याचा उलगडा झाला.  याप्रकरणी त्या मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात घरमालकीणी विरुद्ध अल्पवयीन मुलास पळविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर, उपनिरीक्षक बाबुराव जाधव, जमादार नरडेले पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...