आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या औरंगाबाद परिमंडल कार्यालयात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या ३० तंत्रज्ञ व ८ यंत्रचालकांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रधान यंत्रचालक श्रावण कोळनूरकर यांचाही सन्मान करण्यात आला.
मुख्य अभियंता भुजंग खंदारे, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, प्रकाश जमधडे, संजय सरग, मोहन काळोगे यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले. सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा, कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, महेश पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय घनबहादूर, उपकार्यकारी अभियंता अविनाश सानप, उपव्यवस्थापक संजय खाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त कर्मचारी : औरंगाबाद शहर मंडल- ललित रेड्डी, मनोज अन्वेकर, केशव कड, नीलेश लोखंडे, सचिन वाघ, सचिन शेजवळ, विनोद तोडरमल, प्रेमचंद चव्हाण, सतीश भालेराव, मिन्हाज इनामदार. औरंगाबाद ग्रामीण मंडल- वैभव चव्हाण, नितीश पल्हाळ, अशोक सुराशे, ज्ञानेश्वर चव्हाण, सुधाकर जाधव, नवनाथ म्हस्कर, मनोज सोनवणे, संतोष मैंद, सोपान झिंजुर्डे, प्रेमदास चव्हाण, गजानन विखनकर, ज्ञानेश्वर आदमाने, वसीमखाँ पठाण, सय्यद असदानी, श्रीकृष्णा सपकाळ, नितीन जाधव, सय्यद राजीयोद्दीन. जालना मंडल – साहेबराव सोनुने, प्रसाद भुसारे, श्रीनिवास चित्राल, ऋषी तिरुखे, संतोष सावंत, गणेश नागरे, शंकर भोकरे, भाऊसाहेब मुळे, लहू शेळके, रामेश्वर भामट, विष्णू घनवट.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.