आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिव्यांग विकास परिषद, मौलाना आझाद रिसर्च अँड टे्निंग इन्स्टिट्यूट, मार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २० व्यक्तींना ‘दिव्यांग भूषण पुरस्काराने’ गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे, प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.कलिमोद्दीन,वाजेद कादरी, साजिद पटेल,अण्णासाहेब वैद्य, इप्का कंपनीचे डाॅ.व्यंकट मैलापुरे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समशेर पठाण यांनी केले तर सूत्रसंचालन शेख मुख्तार व सतीश वानखडे यांनी केले. अाभार रमजान खान यांनी मानले. कार्यक्रमासाठी अखिल पटेल, हाजी इब्राहिम, जफर पठाण, अवेज पटेल, सकलेन पटेल, आरेफ पठाण, शेख अंजुम, शेख सना यांनी परिश्रम घेतले.
यांचा केला सन्मान: पारसचंद साकला, मुद्दसीर अन्सारी, शेरू पटेल, उमेदउल्ला खान, मोहंमद वहाजोद्दीन, हाफिज फैज अहमद, शिवाजी विश्वनाथ गाडे, शिवाजीराव प्रतापसिंह राठोड, गोविंदअप्पा शामराव डांगे, चंद्रकला बाबुराव जाधव, शकुर हसनोद्दीन शेख, कौशल्याबाई असरवाल, शेख शमीम चाँद, पवनकुमार कट्यारमल, अनंत नीळकंठ पाटील, शाहुराज तुकाराम चित्ते, निजाम इसा पठाण, सय्यद रुबिना सुलताना, प्रशांंत भाऊराव चाबुकस्वार, अन्सार बन्नुशा शेख आदींना सन्मानित करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.