आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अंध मुलींना परीक्षेत लेखनिक म्हणून मदत करणाऱ्या 35 युवतींचा सन्मान; बाहेती अंध मुलींच्या व्यवसाय प्रशिक्षण प्रकल्पात कौतुक सोहळा

वाळूज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिसगाव परिसरातील अंध मुलींच्या व्यवसाय व प्रशिक्षण प्रकल्पातील मुलींना दहावी, बारावी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी तसेच अंतिम परीक्षा देण्यासाठी लेखनिक म्हणून मदत करणाऱ्या ३५ मुलींचा नुकताच सत्कार करण्यात आला. अंध मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बाहेती प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रोत्साहन दिले जाते.

विशेष म्हणजे या मुलींना पुस्तके वाचून दाखवण्यासाठी तसेच परीक्षेत लेखनिक उपलब्ध करून देण्यासाठी तनवाणी विद्यालयाचे प्रदीप माळी प्रयत्न करतात. यासाठी त्यांना हनुमान भोंडवे, बजाजनगरातील राजा शिवाजी विद्यालयातील प्राचार्य डॉ. एस. एस कादरी मदत करतात.

या वेळी कॅनपॅक इंडियाचे व्यवस्थापक विक्रम पोदार, एस. राहुरीकर, मनोज पल्लोड, जनार्दन काळे, शैलेश पारते, पाटबंधारे विभागाचे मनीष निरंजन, क्षितिज फाउंडेशनच्या डॉ. स्नेहल चौधरी, अॅड. राजेंद्र दरफळे यांची उपस्थिती होती. माणकेश्वर बढे यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर सूर्यवंशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेंद्र वैद्य यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी ज्ञानेश्वर वडकर, सविता साळवे, ज्योती जाधव, संगीता पवार, सिंधुबाई गाडे, कमल वाघ, संगीता निकाळजे, सुमन सरोदे, नानासाहेब शिरसाठ, फिरोज शेख आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...