आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयास यूथ फाउंडेशन काम करत आहे. नुकतेच प्रयासने वार्षिक स्नेहमिलनात पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले.भानुदास चव्हाण मेमोरियल हॉलमध्ये वार्षिक स्नेहमिलनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्रयास संस्थेचे उपाध्यक्ष शिल्पा बाबरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पक्षिमित्र डॉ. किशोर पाठक, दिलीप भोपे, सीए विवेक जोशी यांची उपस्थिती होती. डॉ. पाठक यांनी पक्षी ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम सादर केले. रवी गावंडे यानी तयार केलेल्या “प्रयास’ गीताचे सादरीकरण करण्यात आले. निसर्ग चित्रकला स्पर्धाही झाली.
चित्रांचे प्रदर्शन : लहान गटात प्रथम क्रमांक रिध्दी वाघ, द्वितीय क्रमांक अजिंक्य पवार तसेच मोठ्या गटात प्रथम क्रमांक सोनाली कनसारे, द्वितीय क्रमांक रिया पाटील या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांपैकी काही निवडक चित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या तेजस्विनी चंदिले यांना वार्षिक सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार देऊन सन्मानित केले. प्रकाश कुलकर्णी यांना प्रयासचे सर्वोत्कृष्ट कार्य निर्वाहक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पर्यावरणावर जनजागृतीसाठी सायकलवर भारत भ्रमणवर जवळपास ११ हजार किलोमीटर सायकल चालवणारे सुनील थोरात यान ग्रीन माइंड् अवॉर्ड देण्यात आले. आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवी ज्ञानप्रकाश चौधरी यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.