आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान ; अब्दुल कय्युम यांच्या कामाचे केले कौतुक

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साप्ताहिक औरंगाबाद युवाचा वर्धापन दिन नुकताच मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी डी.एम.मुगळीकर होते. या वेळी मुगळीकर यांनी आजच्या माध्यमांच्या स्थितीवर विचार व्यक्त केले. साप्ताहिक युवाचे संपादक अब्दुल कय्युम यांच्या कामाचे कौतुक केले. इब्राहिम पठाण, हिशाम उस्मानी, शारेक नक्शबंदी, सय्यद साबेर, मकसूद अन्सारी, कचरू पाटील वेळंजकर, अनिलकुमार शिंपी, डॉ.शेख शाहेद, परवेज खान, मुख्तार खान, डॉ. शकील शेख आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...