आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॉटेल मालकाची तब्बल 18 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक करणारा मॅनेजरला तथा आरोपी गणेश जया शेट्टी (42, रा. मीरा रोड, मुंबई, मूळ गाव बंगळुरू कर्नाटक) याने सादर केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी. बेदरकर यांनी नामंजूर केला.
13 लाखांचा गैरव्यवहार
समर्थनगर भागात अर्जुन पृथ्वीराज चव्हाण (35, रा. समर्थनगर) यांच्या आईने सुरू केलेले इरा हॉटेल व बार आहे. चव्हाण यांच्याकडे काम करण्यासाठी 2 ऑक्टोबर 2029 ला गणेश शेट्टी हा कामाला लागला. मॅनेजर शेट्टी याने चव्हाण यांचा विश्वास संपादन केले. हॉटेलमधील खर्च वाढला. चव्हाण यांनी हॉटेलमधील आर्थिक व्यवहाराची पडताळणी केली असता, गणेश शेट्टी याने 13 लाख 87 हजार 599 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला. हे प्रकरण समोर आल्यानंतरही गणेश शेट्टी याने गल्ल्यातील 40 हजार, 60 हजाराची उचल करून पसार झाला. या प्रकरणी अर्जुन चव्हाण यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात मॅनेजर गणेश शेट्टी विरोधात 2 ऑक्टोबर 2019 ते 10 जून 2022 च्या काळात 18 लाख 87 हजार ५९९ रूपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
कोठडीत रवानगी
आरोपी गणेश शेट्टी याला 14 जून रोजी रात्री पोलिसांनी अटक केली. त्याची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनीसाठी अर्ज सादर केला असता न्यायालयाने तो नामंजूर केला. प्रकरणात सहायक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.