आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेल मालकाची 18 लाखांची फसवणूक:मॅनेजरला 17 जूनपर्यंत पोलिस कोठडी; औरंगाबादेतील समर्थनगर येथील प्रकार

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेत हॉटेल मालकाची तब्बल 18 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या मॅनेजरला क्रांतीचौक पोलिसांनी मंगळवारी अटक केली. गणेश जया शेट्टी (42, रा. मीरा रोड, मुंबई, मूळ गाव बंगळुरू कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याला 17 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.पी. बेदरकर यांनी दिले.

समर्थनगर भागात अर्जुन पृथ्वीराज चव्हाण (35, रा. समर्थनगर) यांच्या आईने सुरू केलेले इरा हॉटेल व बार आहे. अर्जुन चव्हाण यांच्याकडे काम करण्यासाठी 2 ऑक्टोबर 2019 ला गणेश शेट्टी हा कामाला लागला. मॅनेजर शेट्टी याने चव्हाण यांचा विश्वास संपादन केले. हॉटेलमधील खर्च वाढला. पण उत्पन्न मिळत नाही. उलट गणेश शेट्टी याला आर्थिक मदत करावी लागत आहे. यामुळे चव्हाण यांनी हॉटेलमधील आर्थिक व्यवहाराची पडताळणी केली असता, गणेश शेट्टी याने 13 लाख 87 हजार 599 रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला. हे प्रकरण समोर आल्यानंतरही गणेश शेट्टी याने गल्लयातील 40 हजार, 60 हजाराची उचल करून पसार झाला. या प्रकरणानंतर गणेश शेट्टी याने कामावर येण्यासाठी अर्जुन चव्हाण यांना फोन केला.

18 लाखांची फसवणूक

अर्जुन चव्हाण यांनी पैसे परत करण्याचे सांगितले. त्यावेळी गणेश शेट्टी याने पैसे खर्च झाल्याचे सांगितले. या प्रकरणी अर्जुन चव्हाण यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात मॅनेजर गणेश शेट्टी विरोधात 2 ऑक्टोबर 2019 ते 10 जून 2022 च्या काळात 18 लाख 87 हजार 599 रूपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी आरोपीकडून गुन्‍ह्यातील रक्कम हस्‍तगत करायची असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...