आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:औरंगाबादच्या हॉटेल मालकाला 18 लाखांचा गंडा, आरोपी मॅनेजरच्‍या कोठडीत वाढ

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद हॉटेल मालकाला तब्बल 18 लाख 30 हजार रुपयांचा गंडा घालणारा मॅनेजर तथा आरोपी गणेश जया शेट्टी (42, रा. मीरा रोड, मुंबई, मूळ गाव -बंगळुरु कर्नाटक) याच्‍या पोलिस कोठडीत शनिवार दि.18 जूनपर्यंत वाढ करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.पी. बेदरकर यांनी शुक्रवारी दिले.

समर्थनगर भागात अर्जुन पृथ्वीराज चव्हाण (35, रा. समर्थनगर) यांच्या आईने सुरू केलेले इरा हॉटेल व बार आहे. अर्जुन चव्हाण यांच्याकडे काम करण्यासाठी 2 ऑक्टोबर 2019 ला गणेश शेट्टी हा कामाला लागला. मॅनेजर शेट्टी याने चव्हाण यांचा विश्वास संपादन केले. हॉटेलमधील खर्च वाढला. पण, उत्पन्न मिळत नाही. उलट गणेश शेट्टी याला आर्थिक मदत करावी लागत आहे. यामुळे चव्हाण यांनी हॉटेलमधील आर्थिक व्यवहाराची पडताळणी केली असता, गणेश शेट्टी याने 13 लाख 87 हजार 599 रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला. हे प्रकरण समोर आल्यानंतरही गणेश शेट्टी याने गल्ल्यातील 40 व 60 हजारांची उचल करून पसार झाला. या प्रकरणानंतर गणेश शेट्टी याने कामावर येण्यासाठी अर्जुन चव्हाण यांना फोन केला.

अर्जुन चव्हाण यांनी पैसे परत करण्याचे सांगितले. त्यावेळी गणेश शेट्टी याने पैसे खर्च झाल्याचे सांगितले. या प्रकरणी अर्जुन चव्हाण यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात मॅनेजर गणेश शेट्टी विरोधात 2 ऑक्टोबर 2019 ते 10 जुन 2022 च्या काळात 18 लाख 87 हजार 599 रूपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीच्‍या कोठडीची मुदत संपल्याने त्‍याला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील नितीन जाधव यांनी आरोपीकडून गुन्‍ह्यातील रक्कम हस्‍तगत करायची असल्याने आरोपीच्‍या कोठडीत वाढ करण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...