आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शहर व जिल्ह्यात सध्या अशत: लॉकडाऊन सुरू अाहे. आता ३० मार्चपासून पूर्णवेळ लॉकडाऊन लागणार अाहे. या सगळ्या परिस्थितीमुळे शहर व जिल्ह्यातील सुमारे ५०० मोठे हॉटेल आणि १३०० पेक्षा जास्त रेस्टॉरंटमधील कामगारांच्या नाेकरीवर गदा अाली अाहे. या उद्योगावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त लोकांचा रोजगार अवलंबून असल्याची माहिती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) या संघटनेने दिली आहे. प्रशासनाने पार्सल सुविधा सुरू राहील असे आदेश दिल्यानंतर अनेक हॉटेल, धाबे आणि रेस्टॉरंटमधील कामगारांचा पगार अर्धा करण्यात अाला. तर काही मोठ्या हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात आले तर काहींना अशत: लॉकडाऊन असेपर्यंत सुटी देण्यात आली आहे.
आता सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयाचा विचार करावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. शासनाने रेस्टॉरंटला नियमित वेळेप्रमाणे सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. गरज असेल तर लाेकांच्या संख्येवर निर्बंध आणावेत अशी विनंती एचआरएडब्ल्यूआयने केली आहे. लॉकडाऊनच्या या निर्णयामुळे कामगार, हॉटेलचे मालक आर्थिक संकटात सापडले आहेत. बँकांचे हप्ते व इतर खर्च करावाच लागत असल्यामुळे काही संस्था दिवाळखोरीत निघू शकतात, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे.
व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्या
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खबरदारी घेतली जाते. हॉटेल इंडस्ट्रीने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना निवारा दिला. दररोज लाखो गरजूंना अन्न पुरवले. हॉटेल इंडस्ट्री एक जबाबदार उद्योग आहे. त्यामुळे हॉटेल व रेस्टॉरंटला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. - शेरी भाटिया, अध्यक्ष, एचआरएडब्ल्यूआय
आम्ही नियमांचे पालन करतो
हॉटेल, रेस्टॉरंट आणि बिअर बारला वाढत्या रुग्णसंख्येसाठी जबाबदार धरणे चुकीचे आहे. प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे आम्ही पालन करताे. अाम्ही कर्मचाऱ्यांना आरोग्य व सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण दिले अाहे. तरीदेखील हॉटेल आणि रेस्टॉरंट कारवाईच्या विळख्यात आले आहेत. - हरप्रीत सिंग, प्रवक्ते, औरंगाबाद हॉटेल अँड रेस्टॉरंट असो.
३० टक्के हॉटेल बंदच
मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटॅलिटी व्यावसायिकांनी आपली जबाबदारी ओळखून व्यवसाय बंद केले होते. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन हटवण्यात आला. तरीही तब्बल ३० टक्के हॉटेल व रेस्टॉरंट सुरू झाले नाही. अाता पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय हाेत अाहे. यामुळे अजून काही हॉटेल व रेस्टॉरंट बंद पडण्याची शक्यता आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.