आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • How Can Two Activists Be On The Streets For Pankaja Munde, Who Is Holding A Dussehra Rally Of Millions Of Supporters? Conspiracy To Deliberately Defame Pankaja

जाणीपूर्वक पंकजांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र:लाखो समर्थकांचा दसरा मेळाव्या घेणाऱ्या पंकजा मुंडेंसाठी दोनच कार्यकर्ते रस्त्यावर कसे?

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप केंद्रीय सचिव तथा राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरूद्ध हेतुपुरस्सर षडयंत्राचा भाग म्हणून उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. पंकजा मुंडे दसरा मेळावा घेतात तेव्हा स्वयंस्फुर्त लाखो समर्थक उपस्थित असतात. पंकजांचे केवळ दोन-तीन समर्थकच आंदोलन कसे काय करू शकतात? पंकजा नाराज असत्या तर लाखो समर्थक रस्त्यावर उतरले असते. प्रत्येक वेळी अशा प्रकारांना उत्तर देऊन बदनाम झाल्यापेक्षा प्रतिक्रिया न दिलेलेच बरे अशी भुमिका घेतल्याचे पंकजा मुंडे यांचे निकटस्थ सतीश नागरे यांनी दिव्यमराठीशी सोमवारी (13 जून) बोलताना स्पष्ट केले.

कुणीतरी दोन-तीन मुलं घोषणाबाजी करतात आणि रस्त्यावर उतरतात. आंदोलन आणि निषेध कसा करायचा हे पंकजा समर्थकांना चांगले ठावूक आहे. विनाकारण पंकजा यांना बदनाम करण्यासाठी कंडी पिकविली जात असल्याचे नागरे यांनी सांगितले. माध्यमे पंकजांना विचारतात पक्षाने विधान परिषदेची संधी दिली तर घ्याल का? तेव्हा पक्ष जो निर्णय घेईल आपणास मान्य राहील असे पंकजांनी म्हटले. एखाद्या मुद्यावर माध्यमांना टाळले तरी टीका आणि बोलले तर त्याचा विपर्यास केला जातो. मत व्यक्त करणे म्हणजे मागणी केली असे होत नसल्याचे नागरे म्हणाले. प्रवीण दरेकर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बीड मध्ये आले. पंकजा समर्थकांनी त्यांची गाडी आमदारकी मिळाली नाही म्हणून अडविल्याच्या बातम्या साफ खोट्या आहेत. माजी आ. विनायक मेटे यांनी लोकसभेला खा. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात प्रचार केला. मेटेंच्या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी दरेकरांनी बीड भाजप जिल्हाध्यक्ष अथवा पंकजा मुंडे ,खा, प्रीतम मुंडे यांच्याशी सल्लामसलत करणे गरजेचे होते. भाजप एकीकडे सामान्य कार्यकर्त्यास बळ देतो आणि येथे पदाधिकारी यांना विचारत घेत नाही. याचा जाब विचारण्यासाठी दरेकरांची गाडी अडविल्याचे नागरे यांनी स्पष्ट केले.

घोषणा देणारे पंकजा समर्थक नाही-डॉ. कराड

रविवारी (१२ जून) रोजी रात्री 7.45 वाजता आपल्या नुतन कॉलनी येथील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करणारे भाजप किंवा पंकजा समर्थक कार्यकर्ते नव्हते असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिव्यमराठीशी बोलताना स्पष्ट केले. बाळासाहेब सानप यांच्या भगवान महासंघाचे सचिन डोईफोडे आणि योगेश खाडे हे दोघे आहेत. त्यांचा पंकजा मुंडेंशी काहीएक संबंध नाही. कुणीतरी ठरवून षडयंत्राचा भाग म्हणून असे प्रकार करीत आहेत. यापूर्वी भाजप कार्यालय आणि नंतर माझ्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली जाते. मद्य प्राशन करून आलेले कार्यकर्ते पंकजा समर्थक असूच शकत नाही. पोलिस प्रशासन त्यासंबंधी चौकशी करीत आहेत असेही डॉ. कराड यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...