आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनिष्ठ:गद्दारी करूनही दानवेंनाच सगळी पदे कशी दिली? ; जिल्हाप्रमुख त्रिवेंदीचा सवाल

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही कायम पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. मात्र, जिल्हाप्रमुख, आमदार अंबादास दानवेंनी तीन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत गद्दारी केली. त्यांच्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पडला. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. उलट त्यांना पक्षाचा प्रवक्ता, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रमोशन मिळाले. गद्दारी करूनही त्यांनाच सगळी पदे कशी, असा सवाल दोन दिवसांपूर्वी शिंदे गटात स्थलांतर केलेले जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी केला. मातोश्रीवर काळी जादू केल्याचा हा परिणाम असावा, असाही टोला त्यांनी लगावला. शनिवारी पत्रकार परिषदेत त्रिवेदी म्हणाले की, जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदार सोडून गेले. संघटनेत फूट पडली, याची नैतिक जबाबदारी म्हणून आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. पण तसे झाले नाही. प्रत्येक निवडणुकीला मी कन्नड, पैठण, वैजापूर मतदारसंघात जीव तोडून काम केले. मात्र, त्या मोबदल्यात आमच्याकडून जबाबदारी काढून घेण्यात आली. दानवेंना बढती देण्यासही माझा विरोध नव्हता. पण त्यांनी आमच्या अधिकारांवर गदा आणली. उद्धव ठाकरेंकडे तक्रार करूनही फरक पडला नाही. बंडखोरी करून पक्षात आलेल्यांना मोठी पदे दिली, असा आरोप जि.प.चे माजी अध्यक्ष राजेंद्र ठाेंबरे यांनी किशनचंद तनवाणी यांचे नाव न घेता केला. या वेळी फुलंब्री तालुक्यातील दहा सरपंचांनी कायकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले की, आमच्याकडे येणाऱ्यांची ताकद लक्षात घेऊनच पदे दिली जातील. लवकरच वाॅर्डनिहाय शाखाही स्थापन होतील.

पवार ग्रामीण जिल्हाध्यक्ष
शिंदे गटाने औरंगाबाद ग्रामीणच्या जिल्हाप्रमुखपदी रमेश पवार यांची निवड केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० ऑगस्ट रोजी पवार यांना नियुक्ती देत त्यांचा सत्कार केला. यावेळी मंत्री संदिपान भुमरे उपस्थित होते. रमेश पवार सन २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत औरंगाबाद तालुक्यातील आडगाव बुु. गटातून निवडून आले होते.

बातम्या आणखी आहेत...