आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुजींची दक्षिणा दुप्पट:मात्र, यंदा लग्न तिथींची संख्या घटली ; शहरात पुरोहितांच्या टंचाईमुळे पूजाविधी पॅकेजचे भाव वाढले

औरंगाबाद / गिरीश काळेकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या लग्नसराईत भोजनावळ, कार्यालय, वाजंत्री यासोबत गुरुजींच्या दक्षिणेतही मोठी वाढ झाली आहे. वैदिक विवाह पद्धतीत सप्तपदी, मधपर्क पूजन, कन्यादान या पूजाविधींसाठी ११ ते २५ हजार रुपयांची दक्षिणा घेण्यात येत होती. त्याचे पॅकेज यंदा २५ ते ५० हजारांच्या घरात गेले आहे. तीच गत साखरपुडा, सत्यनारायण, वास्तुशांती आदी पूजांसाठीही आहे. या विधींसाठी आतापर्यंत ५ ते १० हजारांची दक्षिणा आकारण्यात येत होती. ती यंदा दुप्पट, तिप्पट झाली आहे. यंदा ४८ लग्न मुहूर्त आहेत. मागच्या वर्षी ते ६२ हाेते.

लग्नसराई हा इव्हेंट झाला असला तरी पारंपरिक पूजाविधी व धार्मिक परंपरा यामुळे पुरोहितांचे महत्त्व कायमच आहे. मात्र, वैदिक शिक्षण घेऊन पूजाविधी करणाऱ्यांची संख्या घटल्याने लग्नविधीपासून सत्यनारायणापर्यंतच्या विधींसाठी गुरुजींची टंचाई भासत आहे. महागाईनुसार गुरुजींनीही पॅकेजमध्ये वाढ केली आहे. वैदिक शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या गुरुजींची दक्षिणा आता पॅकेज सिस्टिमप्रमाणे आकारण्यात येत आहे. अनेक गुरुजी वैदिक शिक्षण न घेताही कर्मकांड पार पाडत आहेत, तर दुसरीकडे १५ ते २० वर्षांचा कालावधी वैदिक शिक्षण घालवूनही मनाप्रमाणे दक्षिणा मिळत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.

मंत्रोच्चार वैदिक अभ्यासानुसारच म्हणावेत महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैनअंतर्गत वैदिक शिक्षण शिकवतो. यात ७ वर्षे चार वेदांचा अभ्यास करावा लागतो. आज वेदांचे शिक्षण न घेता कर्मकांड सुरू आहे. मंत्रोच्चार वैदिक अभ्यासानुसार म्हणावेत. स्पष्ट उच्चार, उच्चार करताना गोडवा असणाऱ्यांना वेदांचे ज्ञान असते. - दुर्गादास मुळे गुरुजी, संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान हर्सूल

निवृत्त कर्मचारीसुद्धा याज्ञिकीत जे निवृत्त अधिकारी, कर्मचारी आहेत तेसुद्धा याज्ञिकीमध्ये येत आहेत. त्याचा परिणाम वैदिक शिक्षण घेऊन याज्ञिकी करणाऱ्यांच्या व्यवसायावर होत आहे. वैदिक शिक्षण न घेता कर्मकांड होत आहे. -प्रवीण कुलकर्णी, गुरुजी

सध्या १० ते १७ वयातील २१ मुले घेताहेत धार्मिक शिक्षण आज कुणीही वेदमंत्रोच्चार करू शकत नाही. वेदांचा अभ्यास असणे आवश्यक आहे. कमीत कमी २० वर्षांचे शिक्षण घेतलेले पाहिजे. आज अशा प्रकारचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. न शिकता कर्मकांड म्हणजे अंधश्रद्धाच. त्यामुळे गुरुजींच्या शिक्षणाबाबत विचारले पाहिजे. सध्या १० ते १७ वयातील २१ मुले शिक्षण घेत आहेत. - श्रीराम धानोरकर, ब्रह्मानंद वेदपाठशाळा, सातारा परिसर

वैदिक शिक्षण न घेताही मंत्रोच्चार, पूजाविधी अनेक गुरुजी वैदिक शिक्षण न घेता पूजापाठ, होमहवन, मंत्रोच्चार करतात. असे गुरुजी मात्र सत्यनारायण पूजा ५०० रुपयांची दक्षिणा घेऊन तर विवाह समारंभ पाच हजार रुपयांपर्यंत करत आहेत. यामुळे अनेक वर्षांचे वैदिक शिक्षण घेऊन पौराेहित्य करणाऱ्या गुरुजींच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे दिसते.

बातम्या आणखी आहेत...