आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीच्या गणिताच्या पेपरला लघुशंकेला जाण्याच्या बहान्याने उत्तरपत्रिका घेवून विद्यार्थी पळाल्याची घटना दुपारी नागसेन माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर घडली. या प्रकाराने केंद्र प्रमुख, पर्यवेक्षकांना तासभर घाम फोडला. जवळपास तास दीडतासानंतर विद्यार्थ्याला एका अभ्यासिकेतून पोलिसांनी पकडून आणले. उशीरापर्यंत ती उत्तरपत्रिका नेमकी गेली कुठे हा प्रश्न मात्र अनुत्तरित होता.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला 21 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. शुक्रवार दि. 3 मार्च रोजी गणित आणि संख्याशास्त्र विषयाचा पेपर होता. सकाळी 11 ते 2 अशी पेपरची वेळ होती. नागसेन माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर दुपारी २ वाजता पेपर सुटण्यासाठी दहा मिनिटे बाकी असतांना एका विद्यार्थ्यांने पर्यवेक्षकांना लघुशंकेस जायचे आहे म्हणून परवानगी मागितली. आता दहाच मिनिटे पेपर सुटायला बाकी आहेत. नंतर जा असे पर्यवेक्षिकेने म्हटल्यावर विद्यार्थी ओटीपोट धरुन उभा राहिला आणि पळाला. हे पाहून पर्यवेक्षिका ओरडल्या सर विद्यार्थी पळाला.
टेबलवर पाहिले तर प्रश्नपत्रिका होती आणि उत्तरपत्रिकेतील फक्त तेरा नंबरचे पान होते इतर पाने नव्हती. असे केंद्र प्रमुखांनी सांगितले. विद्यार्थी शोधण्यासाठी कर्मचारी गेेले असता विद्यार्थी पळून गेला होता. त्वरीत पोलीसांना कळवण्यात आले. पोलीसांनी त्या विद्यार्थ्याच्या मागे पुढे बसलेल्या विद्यार्थ्यांकडे चौकशी केली. त्याच्या परिचित मित्रांना विचारणा करण्यात आली. त्यांनी सांगितले की, पेपरला येण्यापूर्वी तो म्हणालो होता की, टेन्शनमध्ये आहे. त्यानंतर पोलीसांनी एका अभ्यासिकेतून विद्यार्थ्याला शोधन पुन्हा केंद्रावर आणले.
का पळाला असे विचारल्यावर इथे बाथ्रुममध्ये पानी नव्हते म्हणून मी गेलो होतो. परंतु उत्तरपत्रिकेची पाने कुठे हे कळाले नसल्याचे त्याने सांगितल्याचे, मी पान फाडलेच नाही असेही तो म्हणत असल्याचे केंद्रप्रमुखांनी सांगितले. उत्तरपत्रिका ही ऊसवण्यात आलेली होती असेही त्यांनी सांगितले. दरम्यान विद्यार्थ्याच्या पालकांना पाचारण करून संबंधित घटनेची माहिती दिली. पोलीस यंत्रणाही तपास करत आहे. या प्रकरणात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. असे सांगण्यात आले. शेवटचे दहा मिनिटे बाकी असतांना विद्यार्थी उत्तरपत्रिका घेवून पळाला.प्रश्नपत्रिका इथेच होती. वर्गावर असणाऱ्या पर्यवेक्षिका ओरडल्या सर बाथ्रुमला जातोय असे सांगून विद्यार्थी उत्तरपत्रिका घेवून पळाला. त्याला पाहण्यासाठी कर्मचारी मागे गेले परंतु तो कंम्पॉण्डवालवरुन पळाला होता. याची माहिती त्वरीत पोलिसांना देण्यात आली. आता बोर्डाच्या नियमानुसार पुढील कारवाई होईल. याची माहिती बोर्डालाही कळवण्यात आली आहे.
आर.टी.चव्हाण केंद्र प्रमुख नागसेन माध्यमिक विद्यालय
तो उत्तरपत्रिका फाडूपर्यंत पर्यवेक्षक, बैठेपथक करत काय होते ?....
परीक्षेदरम्यान परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे काम हे पर्यवेक्षकांचे असते. वर्गात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये याची जबाबदारी देखील पर्यवेक्षकांची असते. मग सदर विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेची शिलाई काढून एकच पान शिल्लक ठेवले. तोपर्यंत पर्यवेक्षकांचे त्या विद्यार्थ्याकडे लक्ष गेले नसावे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
नागसेन माध्यमिक विद्यालयात आज 12 वी गणिताचा पेपर सुरू होता. पंपर संपताच उत्तर पत्रिका गोळा करत असताना शिक्षकांना फोटलेली उत्तर पत्रिका दिसून आली. यानंतर हा प्रकार उपस्थित शिक्षकांच्या लक्षात आला आहे. यात विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेचे पाहिले पान फाडलेले आहे, असे दिसून येताच शिक्षकाने ही माहिती केंद्र प्रमुखांना दिली आहे. या प्रकरणी कोणता विद्यार्थी उत्तर पत्रिका घेऊन पळूल गेला याबाबत माहिती समोर आली नाही. मात्र बोर्ड आणि शिक्षण विभागाकडून या संदर्भात चौकशी सुरू आहे.
हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत.....
वाचा संबंधित वृत्त
बुलढाण्यात बारावी गणिताचा पेपर फुटला:परीक्षेच्या अर्धा तासापूर्वीच पेपर सोशल मीडियावर व्हायरल, विधानसभेत उमटले पडसाद
बुलढाण्याच्या सिंदखेडराजामध्ये बारावी गणिताचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. हा पेपर सकाळी साडेदहापासून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. परीक्षेपूर्वीच अर्धा तास आधीच गणिताच्या पेपरचा हा फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. यादरम्यान कॉपीसारखे अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठी काळजी घेतली जात आहे. मात्र असे असतानाही परीक्षादरम्यान गोंधळाचे प्रकार समोर आले आहेत. याआधी बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये उत्तर छापण्याचा प्रकार समोर आला होता. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.