आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचएसजे इलेव्हन संघ अंतिम फेरीत:युनिव्हर्सल अकादमीवर 2 गडी राखून मात; पैठण येथे सुरू असलेल्या अर्बन कॅन्सेप्ट वनडे स्पर्धेत चुरस

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण येथे सुरू असलेल्या अर्बन कॅन्सेप्ट वनडे स्पर्धेत एचएसजे इलेव्हन संघाने अंतिम फेरीत धडक मारली. शुक्रवारी झालेल्या उपांत्य लढतीत एचएसजेने युनिव्हर्सल अकादमीवर २ गडी राखून मात केली. कल्पेश सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना युनिव्हर्सल संघाने 25.2 षटकांत सर्वबाद अवघ्या 99 धावा उभारल्या. त्यांचे सलामीचे चार फलंदाज स्वस्तात परतले. श्वेता सावंत (4), अभिषेक इंदापुरे (7), विजय गोडसे (9) व अर्थव बोडखे (1) विशेष कामगिरी करू शकले नाहीत.

पाचव्या क्रमांकावर आलेल्या हर्ष शेळकेने एकाकी लढत दिली. त्याने 37 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह सर्वाधिक 41 धावा काढल्या. स्वागतच्या 10 धावा वगळता इतर एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. एचएसजेकडून विवेक घुगेने 29 धावा देत 4 गडी बाद केले. प्रद्युम्न कायंदेने 11 धावांत 3 आणि वंश सलगरेने 30 धावांत 2 बळी घेतले. अश पाटीलने एकाला टिपले.

वंश, प्रद्युम्नची अष्टपैलू कामगिरी

प्रत्त्युतरात एचएसजे इलेव्हन संघाने 31.5 षटकांत 8 गडी गमावत 103 धावा करत विजयी लक्ष्य गाठले. गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या वंश सलगरे व प्रद्युम्न कायंदे यांनी फलंदाजीत देखील आपली चुनक दाखवत आपल्या संघाला विजयी केले.

एचएसजेची सुरुवात खराब झाली. त्यांचे सलामीवीर रितेश वाहुळकर, क्षितिज चव्हाण विक्रम बी. हे आघाडीचे फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. महेश राठोड (1) आणि विवेक घुगे (5) आल्यापावली तंबूत परतले. सहाव्या क्रमांकावर आलेल्या लक्ष्मण शिंदेने सर्वाधिक 28 धावा केल्या. या खेळीत त्याने 44 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचले. अष्टपैलू वंश सलगरेने 49 चेंडूंत 2 चौकारांसह नाबाद 21 धावा काढल्या. प्रद्युम्न कायंदेने 35 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकार खेचत नाबाद 23 धावांची विजयी खेळी केली. युनिव्हर्सलच्या कल्पेशने 23 धावा देत 5 गडी बाद केले. शिवम शिंदेने 2 बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...