आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आक्रमक:औरंगाबादमध्ये पाणी प्रश्न पेटला, भांडी वाजवत भाजपचा महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी मोर्चा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहर भाजपकडून पाण्यासाठी आज सिडको एन-5 येथे पाण्याच्या टाकीसमोर आंदोलन करण्यात आले आहे. त्यानंतर भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरीक चांगलेच आक्रमक झाले व त्यांनी भांडी वाजवत आपला मोर्चा महापालिका आयुक्तांच्या घरी वळवला.

शहरातील काही भागात 4 ते 5 दिवसांनी पाणी पुरवढा होतो. आणि सिडको आणि हडको परिसरात आठ दिवसांनी पाणी पुरवढा केला जातो. असा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे. तर यांची तक्रार देण्यास गेल्यावर अधिकारी मुजोरी करतात असा आरोप नागरिकांनी केला आहे. यावेळी काही नागरिकदेखील रिकामे हंडे घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते.

भाजपकडून सिडको एन 5 येथील पाण्याच्या टाकीवर आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी शेकडो भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी पाण्याच्या टाकीच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी डोक्यावर हंडा घेत घोषणाबाजी केली. तर भांडी वाजवत, पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, देत कसे नाही मिळायलाच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

मराठवाड्यात उन्हाळ्यात नेहमी पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. यातच औरंगबाबादमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सिडको भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या विरुद्ध भाजपकडून आंदोलन करण्यात आले. निवेदन देण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानी धडक दिली, यामुळे आंदोलनाची चर्चा सुरू आहे. या आंदोलनावेळी भाजपचे आमदार अतुल सावे आणि भाजपचे माजी नगरसेवक उपस्थित होते.

महापालिका आयुक्त शिवसेनेची मार्केटिंग करतात

औरंगाबाद मनपाचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केला होता. यावेळी आयुक्त पांडेय शिवसेना शाखाप्रमुख सारखे वागत असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला होता. तर केंद्राने दिलेल्या निधीचा श्रेय शिवसेनेला दिला जात आहे. असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. यामुळे आज झालेला मोर्च्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...