आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धम्म मेळावा:संविधान संपवण्याच्या मार्गावरच मनुवादी शक्ती : राजेंद्रपाल गौतम

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“मनुवादी शक्ती संविधान संपवून टाकण्याच्या मार्गावर आहे. असे झाले तर मनुस्मृती पुढे येईल. त्यामुळे पुन्हा गुलामगिरी येईल. त्यासाठी लढा देण्याची वेळ आली आहे. भीमा कोरेगावला विसरू नका,’ असा इशारा दिल्ली आपचे माजी मंत्री राजेंद्रपाल गौतम यांनी दिला. अनागरिक धम्मपाल प्रचार समितीच्या वतीने टीव्ही सेंटर मैदानावर पहिल्यांदाच आयोजित ‘धम्म मेळाव्या’ला हजाराे अनुयायांची उपस्थिती हाेती. या वेळी दिल्लीतील आप सरकारमध्ये मंत्रिपदी राहिलेले राजेंद्रपाल गौतम, चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्यातून आलेले धृतांगधारी भिक्खू ज्ञानज्योती, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे आणि समितीचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद सोनवणे उपस्थित होते. या वेळी समता सैनिक दलाने सलामी दिली.

प्रास्ताविकात मुकुंद सोनवणे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी धम्मदीक्षा घेतल्यानंतर संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पाहिले होते. हा धम्म मेळावा त्याचाच भाग आहे. मेळाव्यातून बौद्धेतरांना धम्माची ओळख करून देत आहोत. डॉ. कांबळे म्हणाले, बुद्धानंतर बाबासाहेब आहेत. त्यांनी माणसांची मने बदलून टाकली होती. समाज विज्ञानवादी व्हावा, विवेकाने चालावे यासाठी २२ प्रतिज्ञा दिल्या. बाबासाहेबांनी जो सिद्धांत मांडला त्यात सर्व बहुजन होते. हिंदू राष्ट्र ज्यांना बनवायचे त्यांना बनवू द्या. गौतम म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी हजारो वर्षांची गुलामी तोडली, आरक्षण दिले. त्या वेळी दोन प्रकारची आंदोलने चालू होती. स्वातंत्र लढ्यात महिलांच्या स्वातंत्र्याची चर्चा नव्हती. गुलामगिरीत असलेल्या समाजाची चर्चा नव्हती. परंतु दुसरीकडे बाबासाहेबांनी विवेक, बुद्धी, तर्काने लढा देत गुलामगिरीतून मुक्त केले. भारतीय संविधान बनवून पुढे जाण्याचा मार्ग केला.

२०२५ पर्यंत पूर्ण करू स्वप्न : बाबासाहेबांचे स्वप्न अद्याप पूर्ण झाले नाही. पण २०२५ पर्यंत नक्की करू. खासगीकरण वाढल्याने शिक्षण महाग झाले आहे. नोकरीच्या संधी बंद होत आहेत त्यामुळे आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागणार आहे. बहुजन संख्या ११० कोटी आहे. त्यामुळे देशाची आर्थिक शक्ती बनू शकते. आम्ही पुन्हा इतिहास बनवू.

२२ प्रतिज्ञांमुळे द्यावा लागला होता राजीनामा राजेंद्रपाल गौतम दिल्लीतील आप सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री होते. बौद्ध धम्माच्या २२ प्रतिज्ञा घेतल्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या पुढे धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठीच राजेंद्र गौतम आयुष्य वाहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...