आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापन दिन:माणुसकी समूह पुरस्कार; आज अखेरची मुदत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या व माणुसकी समूहाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त समाजाच्या तळागाळातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दात्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रस्ताव पाठवण्यासाठी सोमवार (५ डिसेंबर) ही अंतिम मुदत आहे. ११ विशेष पुरस्कार व सामाजिक कार्य, आरोग्य सेवक, महाराष्ट्र पोलीस, आदर्श शिक्षक, क्रीडा, युवा उद्योजक, कृषिभूषण, कवी, भारूडरत्न तथा शाहीर असे ३१ पुरस्कार प्रदान करण्यात येतील. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरवले जाणार आहे. विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून सोमवारपर्यंत प्लॉट क्रमांक ६० , हरी ओम नगर जटवाडा रोड हर्सूल येथे पाठवावेत, असे आवाहन सुमित पंडित यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...