आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेकडो डॉक्टर रजेवर:सातव्या वेतन आयोगासाठी ससून रुग्णालयासह राज्यभरातील 550 डॉक्टरांच्या सामूहिक रजा, रुग्णांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचा संघटनांचा दावा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारने आमच्याकडे लक्ष न दिल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले - आंदोलनकर्ते

सातवा वेतन आयोग लागू व्हावा, कोविड योद्धा डॉक्टरांचा सन्मान व्हावा, अस्थायी प्राध्यापकांना नियमित करावे या आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांनी आजपासून संप पुकारला आहे. राज्यभरातील 550 डॉक्टर आजपासून सामूहिक रजेवर गेले आहेत.

नाईलाजाने आंदोलन करण्याची वेळ

सहाय्यक डॉक्टर आणि प्राध्यापक हे मागील सहा महिन्यांपासून सातवा वेतन आयोग लागू करावा आणि कोविड योद्धा डॉक्टरांचा सन्मान करावा यासाठी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत आहोत. पण केवळ आश्वासने दिली. मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नाईलाजाने हे आंदोलन करण्याची वेळ आल्याचे पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर नंदकुमार साळुंके यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

संप काळात कोरोना रुग्णांची हेळसांड होणार नाही

साळुंके म्हणाले की, संपाच्या काळात कोरोना रुग्णांची हेळसांड होणार नाही. त्यांची योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. वैद्यकिय संघटनेचे आंदोलन असल्याने इतर डॉक्टर कोविड रुग्णांकडे लक्ष देतील. आम्ही जीवावर बेतून कोविड काळात काम केले. आम्हाला कोरोना काळात संप करण्याची विशेष आवड नाही. पण सरकारने आमच्याकडे लक्ष न दिल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या की, रुग्णसेवेत तत्काळ रुजू होऊ असेही त्यांनी सांगितले.