आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभूक लागल्यावर चिडचीड वाढते, असे अनेकदा जाणवते. छोट्या छोट्या गोष्टींनीही राग येतो. हे काही असामान्य नाही. यामागे शारीरिक व मानसिक दोन्ही कारणे आहेत. क्लीव्हलँड क्लिनिकच्या डॉ. क्रिस्टीन ली यांच्या मते याला ‘हँग्री’ म्हणतात. हा शब्द हंगर म्हणजे भूक व अँग्री म्हणजे क्रोध या दोन शब्दांपासून बनलेला आहे. भूक थेट नकारात्मक भावनांशी संबंधित आहे. भूक आपली वागणूक व निर्णयक्षमतेवर परिणाम करू शकते.
प्रथिने आणि फायबरचे पदार्थ खा हँग्रीला आळा घालण्यासाठी अन्नात प्रथिने, फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असलेल्या गोष्टी घ्या. तुम्ही रागात असता तेव्हा फक्त कार्बोहायड्रेट खाता, त्यामुळे रक्तातील ग्लुकोज झपाट्याने वाढते. असे सतत होत राहिल्यास मधुमेह होऊ शकतो.
दोन पद्धतींनी ‘हँग्री’ला बळी पडण्याची शक्यता : : पहिली आहे संप्रेरक, भूक लागल्यावर ग्लुकोज घसरू लागते. संप्रेरक शरीराला संदेश पाठवते आणि शरीर अॅड्रेनालाइन (सतर्कता) आणि कार्टिसोल (ताण) हार्मोन्स सोडते. या दोन्हीमुळे रक्तातील साखर वाढते, परंतु रक्तातील याची सतत वाढ शरीराला हाय अलर्ट मोडवर ठेवते. यामुळे चिडचिड आणि राग येतो. दुसरी आहे न्यूरॉन. न्यूरॉन भूक आणि भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या हायपोथालेमसवर परिणाम करतो. ‘हँग्री’ AgRP न्यूरॉन्स नावाच्या पेशी सक्रिय करते. या पेशी नकारात्मक भावना सक्रिय करतात.
हे करा : फायबर व प्रोटीन असलेले हेल्दी स्नॅक्स सोबत ठेवा.
} दिवसातून अनेक वेळा थोडे थोडे खा. } जंक फूड टाळा, कारण ते खाल्ल्यावर साखर प्रथम वाढते. } आरोग्यदायी स्नॅक्स उदा. नट, सुका मेवा, फळे इ. सोबत ठेवा. भूक लागल्यावर ते खा. त्यामध्ये फायबर आणि प्रथिने असतात, त्यामुळे भूक दीर्घकाळ लांबते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.