आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:चक्रीवादळाने बाष्पयुक्त ढग खेचले, राज्यावर कोरड्या ढगांची गर्दी, काहिली सुरूच

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समुद्रातील चक्रीवादळाने बाष्पयुक्त ढग खेचून घेतले. ते पश्चिम महाराष्ट्र, गोव्याला वळसा घालून पुढे दक्षिणेत जात आहेत.

ताशी २० किमी वेगाचे पश्चिमी
वारे कोरडे ढग उ. महाराष्ट्र, विदर्भाकडे ढकलत आहेत, त्यामुळे आर्द्रता वाढून उष्णता आणि उकाडा अधिक जाणवत आहे.

चक्रीवादळ विरल्यानंतर ही क्रिया थांबेल. पुढील दोन दिवसांमध्ये तुरळक पाऊस होऊन महाराष्ट्रातील तापमान काहीसे कमी होईल. १३ मे रोजी उपग्रहाद्वारे टिपलेल्या छायाचित्रातून ढगांची स्थिती दिसत आहे.

दिवसांमध्ये तापमान घटेल
वादळाने बाष्प खेचल्याने सध्याचे ढग कोरडे आहेत. तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे. वादळ विरल्यानंतर तापमान कमी होईल.
के. एस. होसळीकर, शास्त्रज्ञ आयएमडी

० अंशांपेक्षा जास्त तापमान असलेली शहरे
अकोला 44.7
अमरावती 44.4
वर्धा 44.2
चंद्रपूर 44.0
जळगाव 43.5
ब्रह्मपुरी 43.3
वाशिम 43.0
मालेगाव 42.6
गोंदिया 42.5
नागपूर 41.9
परभणी 41.4
औरंगाबाद 40.6
बुलडाणा 41.2

बातम्या आणखी आहेत...