आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेऊन आत्महत्या:पत्नी मुलांना घेऊन गेल्याने पतीची आत्महत्या

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कैलासनगरात वर्षभरापूर्वी पत्नी मुलांसह निघून गेल्यानंतर दारूच्या आहारी गेलेल्या ३७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेत वर्षभरापूर्वीच लग्न झालेल्या २१ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवले.

सचिन भिकाप्पा माटे हा कुटुंबासह कैलासनगरात राहत होता. त्याची पत्नी वर्षभरापासून मुलांसह वेगळी राहायला लागली. त्यामुळे तणावाखाली गेलेल्या सचिनला दारूचे व्यसन जडले. बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता त्याने गळफास घेतला. कौटुंबिक कारणातूनच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पाेलिसांनी वर्तवला.

कुटुंबीय म्हणाले, गुन्हा नोंदवा, मगच अंत्यसंस्कार करू
हर्सूल परिसरातील सारा सिद्धी कॉलनीतील कावेरी कृष्णा सोनवणे (२४) या विवाहितेने आत्महत्या केली. पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळलेल्या कावेरीने मंगळवारी भावाला कॉल केला होता. तेव्हा तिने जीवाचे बरेवाईट करून घेण्याचा उल्लेख केला. तेव्हा भावाने तिची समजूत काढली. मात्र, बुधवारी सायंकाळी सहा वाजता तिने गळफास घेतला. गुरुवारी कावेरीच्या कुटुंबाने गुन्हा दाखल झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याचा निर्णय घेत हर्सूल पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी कुटुंबाची समजूत घातली.

बातम्या आणखी आहेत...