आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता लढाई न्याय्य हक्काची:पती धनंजय मुंडेंनी मला जेलमध्ये टाकले, त्यांच्या विरुद्ध पुढची निवडणूक लढणार, करूणा शर्मा यांनी दिले आव्हान

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या मी 12 एप्रिलला होणारी कोल्हापूरची पोटनिवडणूक लढणार आहे. पण 2024 मध्ये धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध उभी राहणार असून ती निवडणूक नवरा-बायकोतील असेल. मला पती धनंजय मुंडे यांनी जेलमध्ये टाकले. आता ही लढाई त्यांच्या विरोधात असून करुणा शर्मा यांच्या न्याय हक्काचीच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या न्याय हक्काची आहे. ती लढाई मी लढणार असल्याचे सुतोवाच करुणा शर्मा यांनी दिव्य मराठीशी बोलताना केले.

दिव्य मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना त्या म्हणाल्या, सर्वांनाच माहित आहे की, माझे पती धनंजय मुंडे यांनी मला जेलमध्ये टाकले. महाराष्ट्रात एवढे सारे पक्ष आहे. 13 कोटी लोक आहेत, पण ते गप्प बसले. मीही गप्प बसले असते तर अन्यायाविरूद्ध कुणीही आवाज उठवला नसता. मी जो आवाज उठवला त्यात मला ताकदीची गरज आहे. मी जर निवडणुकीत विजयी होऊन विधानसभेत गेले तर मी तेथे 13 कोटी जनतेचा आवाज म्हणुन प्रश्नांना वाचा फोडू शकेल.

आगामी 2024 ला धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध त्यांच्याच मतदारसंघात मी विधानसभा निवडणूक लढणार आहे. नवऱ्याविरूद्ध बायको ही लढत होणार हे मी आताच सांगते. ही लढाई न्याय आणि हक्काची आहे. केवळ करूणा धनंजय मुंडे यांची नाही. ती 13 कोटी लोकांच्या न्यायाची आहे.

आज एसटी कर्मचारी चार महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. 100 लोकांनी आत्महत्या केल्या. आझाद मैदानात विविध प्रश्नांवर कामगार, शिक्षक, परिचारीका आवाज उठवित आहेत. पण सरकार त्यांचे काही ऐकत नाही, त्यांचा आवाज विधानभवनात कुणी पोहचविणारे नाही मला वाटते की, मी केवळ कोल्हापूरच्या जनतेचाच नव्हे तर राज्यातील सर्व जनतेचा आवाज बनुन मी विधानसभेत जाणार आहे, त्यासाठी ही निवडणूक लढवित आहे असेही त्या म्हणाल्या.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. करुणा शर्मा यांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे.

धनंजय मुंडेंवरील आरोपानंतर आल्या चर्चेत
महाविकास आघाडीत सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपानंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या आहेत. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या अधिकृत उमेदवार असतील.

बातम्या आणखी आहेत...