आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:कामठा फाटा जवळ भरधाव ट्रकची दुचाकीस धडक पतीचा मृत्यू पत्नी गंभीर जखमी

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर कामठा फाटा जवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. ६)  दुपारी घडली आहे. राजकुमार कुराडे (रा.लहान,तालुका अर्धापूर) असे मयताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्धापूर तालुक्यातील लहान येथील राजकुमार  कुराडे ( ५२ )व त्यांची पत्नी चंचलबाई राजकुमार कुराडे ( ४४ ) हे दोघे त्यांच्या दुचाकी वाहनावर (क्र. एमएच. २६-जे- ३०८९ ) वाशीम येथे जात होते. आज दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान त्यांचे दुचाकी वाहान आखाडा बाळापुर ते कळमनुरी मार्गावर कामठा फाटा शिवारात आले असताना कळमनुरीकडून बाळापूर कडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने ( क्र. एमपी-०९- २४३४ )  त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये राजकुमार कुराडे यांचा जागीच मृत्यू झाला तर चंचलबाई कुराडे गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. या परिस्थितीतही ट्रक चालकाने ट्रक मधून बाहेर निघून पलायन केले.

या अपघाताची माहिती मिळताच आखाडाबाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर,  उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने जखमी झालेल्या चंचलबाई कुराडे यांना उपचारासाठी नांदेड येथे हलवले.  

दरम्यान मयत राजकुमार कुराडे व त्यांची पत्नी चंचलबाई कुराडे हे दोघेजण वाशिम येथे सासरवाडीला जात होते. घटनास्थळावर कपड्यांचा आहेर व इतर साहित्य आढळून आल्यामुळे ते कार्यक्रमासाठी जात असावे अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आखाडाबाळापुर पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला होता.

Advertisement
0