आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैद्राबाद मुक्तीसंग्राम क्रीडा महोत्सव बुधवारपासून:9 क्रीडा प्रकारात होणार स्पर्धा, जवळपास 5 हजार खेळाडू होणार सहभागी

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरस्वती भुवन शिक्षण संस्था आणि अ‍ॅडव्होकेटस् स्पोर्टस अ‍ॅण्ड कल्चरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हैद्राबाद मुक्तीसंग्राम क्रीडा महोत्सवाचे 10 ते 15 सप्टेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा सभु महाविद्यालय, एमपीपी स्पोर्टस पार्क व मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर (एमएसएम) खेळवल्या जातील.

कोरोनानंतर होत असलेल्या स्पर्धेत पुन्हा एकदा जवळपास 5 हजार खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती अ‍ॅडव्होकेटस् स्पोर्टस अ‍ॅण्ड कल्चरल असोसिएशन अध्यक्ष अ‍ॅड. गोपाळ पांडे यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

या पत्रकार परिषदेला अ‍ॅड. संकर्षण जोशी, डॉ. विशाल देशपांडे, डॉ. दयानंद कांबळे, सतिश पाठक आदींची उपस्थिती होती.

अ‍ॅड. पांडे म्हणाले की, अनेक शाळांनी यंदा स्पर्धा होणार की नाही, या बाबत सतत विचारणार केली. स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसून आले. या क्रीडा महोत्सवात एकूण 9 विविध खेळाच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. यामध्ये लंगडी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल या सांघिक खेळांसह अ‍ॅ​थलेटीक्स, जिम्नॅस्टिक, जलतरण व मल्लखांब या वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा पार पडतील. विविध स्पर्धेसाठी विविध वयोगट ठेवण्यात आले आहे.

अ‍ॅड. संकषर्ण जोशी म्हणाले की, खो-खो, व्हॉलीबॉल, अ‍ॅथेलेटिक्स या खेळांच्या स्पर्धा सभु महाविद्यालयाच्या मैदानावर, जलतरण, फुटबॉल, जिम्नॅस्टिक व मल्लखांब या स्पर्धा एमपीपी स्पोर्ट्स पार्क, ताज हॉटेलसमोर, हिमायत बाग येथे आणि बास्केटबॉल, लंगडी खेळाच्या स्पर्धा मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

8 सप्टेंबर नोंदणीची अखेरची तारीख ​​​​​​​

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शहर व जिल्ह्यातील शाळांचे संघ व खेळाडू शाळेच्या लेटरहेडवर 8 सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी करु शकतात. विजेत्या खेळाडूंना पदक, प्रमाणपत्र व ट्रॉफी बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन 10 सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता सभुच्या मैदानावर विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सदस्य किशोर शितोळे यांच्या हस्ते होईल.

बातम्या आणखी आहेत...