आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद मुक्तिसंग्राम क्रीडा महोत्सव:वुडरीज स्कूल फुटबॉल चँम्पियन; जलतरणमध्ये केशव, इशिता, पूर्वा, प्रसन्नला सुवर्णपदक

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरस्वती भुवन शिक्षण संस्था आणि अँडव्होकेटस स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हैदराबाद मुक्तिसंग्राम क्रीडा महोत्सव 2022 मध्ये फुटबॉल स्पर्धेत वुडरीज शाळेच्या संघाने विजेतेपद पटकावले. हिमायत बाग येथील एमपीपी स्पोर्ट्स पार्क येथे झालेल्या स्पर्धेत 20 संघांनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात द जैन इंटरनॅशनल स्कूलला वुडरीज संघाने 2-0 गोलने आणि होली क्रॉस संघाने हँप स्कूलवर 1-10 गोलने मात करत फायनलमध्ये प्रवेश केला. अंतिम सामन्यात वूडरीज संघाने होली क्रॉसला एकतर्फी लढतीत 2-0 अशा गोल फरकाने पराभूत करत अजिंक्यपद मिळवले. सामन्यात झेद हाश्मी आणि अंश मुंडे यांनी प्रत्येकी एक-एक गोल करत आपल्या संघाला चँम्पियन बनवले. स्पर्धा प्रमुख म्हणून मोबीन यांनी काम पाहिले .

जलतरण : केशव, इशिता, पूर्वा, प्रसन्नला सुवर्णपदक :

एमपीपी जलतरण तलाव येथे झालेल्या स्पर्धेत 100 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख कांचन बडवे यांनी परिश्रम घेतले.

जलतरण स्पर्धेचा निकाल :-

10 वर्षे गट 36 मी. फ्री स्टाईल मुले - केशव खेमका (सुवर्ण), कैवल्य बोर्डे (रौप्य), ओमकार दळवी (कांस्य). मुली - इशिता भावले, अस्मिता हाके, प्राची गायकवाड.

14 वर्षे 50 मीटर फ्री स्टाईल मुले - प्रसन्न नजन, प्रगुन खेमका, रोहन सोनवणे. मुली - पूर्वा दळवी, संस्कृती सुरडकर, विभा बोर्डे.

17 वर्षे 50 मीटर फ्रीस्टाइल मुले - श्लोक देवकर, प्रणव मिटकरी, पवन पाटील.

10 वर्षे 36 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मुले - कैवल्य बोर्डे, अस्मिता हाके.

50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक 14 वर्षे मुले - तन्मय कल्याणकर, अहमद यार खान, प्रसन्न नजन. मुली - संस्कृती सुरडकर, विभा बोर्डे. 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक 17 वर्षे मुले - श्लोक देवकर, पवन पाटील, प्रणव मिटकरी.

50 मीटर फ्रीस्टाइल 10 वर्षे मुले - केशव खेमका, कैवल्य बोर्डे, ओमकार दळवी. मुली - इशिता भावले, अस्मि हाके, प्राची गायकवाड.

100 मीटर फ्रीस्टाइल 14 वर्षे मुले - प्रसन्न नजन, प्रगुन खेमका, तन्मय कल्याणकर. मुली - पूर्वा दळवी, यास्मिन खान, संस्कृती सुरडकर.

100 मीटर फ्रीस्टाइल 17 वर्षे मुले - श्लोक देवकर, प्रणव मिटकरी, साईराज तालीमकर. 100 मीटर ब्रेस्ट्रोक 14 वर्षे मुले - तन्मय कल्याणकर, अहमद यार खान, प्रसन्न नजन. मुली - यास्मिन खान, संस्कृती सुरडकर.

बातम्या आणखी आहेत...