आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • I Am Not Against Anyone Here, I Want A Strong Opposition Party: Modi; The President Warmly Welcomed The Prime Minister To His Hometown

घराणेशाहीवर जोरदार हल्ला:राष्ट्रपतींनी आपल्या मूळ गावी केले पंतप्रधानांचे जोरदार स्वागत; मी इथे कुणाच्याही विरोधात नाही -मोदी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देश आणि लोकशाहीला समर्पित पक्षांमध्ये मला मजबूत विरोधी पक्ष हवा आहे. मी कोणाच्या विरोधात नाही, माझे कुणाशीही शत्रुत्व नाही. लोकशाही बळकट करण्यासाठी घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांनी त्यातून बाहेर पडले पाहिजे. घराणेशाहीच्या तावडीत अडकलेल्या पक्षांनी यातून स्वतःची सुटका करून घेतली तरच लोकशाही मजबूत होईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी व्यक्त केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मूळ गाव कानपूर येथील पारौंख येथे पोहोचलेल्या मोदी यांनी राजकीय पक्षांच्या घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला. तत्पूर्वी त्यांचे राष्ट्रपतींकडून हेलिपॅडवर स्वागत करण्यात आले.

माझे गाव आपले ऋणी : कोविंद राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या गावी पोहोचलेल्या पंतप्रधानांचे हेलिपॅडवर स्वागत केले. पंतप्रधान म्हणाले, राष्ट्रपतींनी पदाच्या मर्यादेबाहेर पडून माझ्या स्वागतासाठी येत त्यांनी मला आश्चर्यचकित केले. ते हेलिपॅडवर मला घेण्यासाठी आले होते. यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. राष्ट्रपती म्हणाले, आमच्या छोट्या गावात पंतप्रधानांचे आगमन ही त्यांची सहृदयता आहे.

बातम्या आणखी आहेत...