आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामार्च १९४७ चे ते दिवस! हवामान हिवाळा-उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर उभे होते, पण वातावरण रक्त व घामाने माखले होते. देशात दंगली भडकल्या होत्या. नवे व्हॉइसरॉय येणार होते. मुस्लिम लीग, काँग्रेस नेते वेगवेगळ्या बैठका घेऊन धोरणे आखत होते. तेव्हा काय उलथापालथ झाली, हे आम्ही १९४७ मधील भारताच्या शब्दात सांगत आहोत.- डॉ. धनंजय चोप्रा. (लेखक, अलाहाबाद विद्यापीठातील सेंटर ऑफ मीडिया स्टडीजमध्ये अभ्यासक्रम समन्वयक आहेत.)
^मार्चच्या सुमारास राजे-राजवाडे-निझाम-नवाबांच्या चेहऱ्यांवर वारे वाहू लागले होते, पण त्यांच्या प्रजेच्या चेहऱ्यावर मुक्तीचा आनंद ओसंडून वाहत होता. इंग्रज अधिकाऱ्यांकडून आपले भले होण्याची अपेक्षा बाळगून असलेले अनेक राजवाडे आणि संस्थाने फाळणीच्या संघर्षापासून स्वत:ला वेगळे राहिले. हैदराबादचा निझाम कोणत्याही परिस्थितीत आपले सिंहासन वाचवण्यात व्यग्र होता. तथापि, दिल्ली, पाटणा, लखनऊ आणि कलकत्तासह माझ्या अनेक शहरांत-गांवांत विचित्र अस्वस्थता व भीती वाढत चालली होती. बंगालनंतर मार्चच्या सुरुवातीलाच बिहार दंगलींच्या आगीत होरपळला आणि गांधीजी तिथे पोहोचले.
तारीख होती-५ मार्च १९४७, काँग्रेस नेत्यांच्या वृत्तीमुळे बापू नाराज होते. काँग्रेसींनी ठिकठिकाणच्या दंगलींपासून स्वत:ला वेगळे ठेवावे, असे त्यांना वाटत होते. इकडे, २० मार्च १९४७ रोजी जयप्रकाश नारायण यांना सोबत घेऊन गांधीजी बिहार पोलिसांचा संप मिटवत होते. आणि तिकडे याच वेळी नार्थोल्ट विमानतळावरून माउंटबॅटन यांनी कुटुंबासह भारताकडे उड्डाण केले. २२ मार्चला दुपारी दिल्लीच्या पालम विमानतळावर माउंटबॅटन, त्यांची पत्नी एडविना आणि १७ वर्षांची मुलगी पामेलाचे स्वागत जवाहरलाल नेहरू आणि लियाकत अली खान करत होते, तेव्हा नव्या व्हॉइसरॉयने शाही अंदाज दाखवण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. २४ मार्चचा तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. तेव्हा दरबार हाॅलमध्ये देशाचे अंतिम ब्रिटिश व्हॉइसरॉय माउंटबॅटन यांना शपथ दिली जात होती. तेव्हा माउंटबॅटन म्हणाले, ब्रिटिश सरकार जून १९४८ पर्यंत सत्ता सोडून देईल आणि भारत स्वतंत्र होईल. शपथविधीनंतर लगेच व्हॉइसरॉय हाउसमध्ये नेहरू आणि माउंटबॅटन यांच्यात बैठक झाली. ३१ मार्च १९४७ रोजी गांधीजी आणि माउंटबॅटन यांची भेट सर्वात खास राहिली. या भेटीत देशाची फाळणी होऊ नये, यावरच गांधीजींचा भर होता. तीन दिवसांनंतर माउंटबॅटन यांनी मोहंमद अली जिनांशी चर्चा केली असता कोणत्याही परिस्थितीत फाळणी होऊन मला माझा स्वतंत्र देश (पाकिस्तान) पाहिजे, असे जिनांनी स्पष्ट केले. - उद्या वाचा : अशी लिहिली स्वातंत्र्याची पटकथा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.