आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:ऑनलाइन काही समजत नाही ताई, पोर नेटर्वकच नाव सांगून येतात शेतात; वर्गात बसवून शिकवा आमच्या पोरांना

औरंगाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

ताई आमच्या पोरासनी ऑनलाइन काहीच समजत नाही. त्यांना वर्गात बसवून शिकवल पाहिजे. शहरातून येणारे जाणारे शिक्षक ज्या शाळेत आहेत.त्यांना मुख्यालयी राहण्यास सांगितल पाहिजे. आमच्या पोरांच्या शिक्षणाच नुसान होतय. नेटवर्क मिळत न्हाय. समजत न्हाय म्हणून पोर पण ऑनलाइल तास करत नाही. ही वस्तूस्थिती आजच्या ऑनलाइन क्लासची असून, गंगाूपर तालुक्यातील घेवधानोरा गावातल्या पालकांनी शाळाच सुरु झाली पाहिजे अशी भावना व्यक्त केली आहे.

देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मार्च महिन्यात परीक्षा न घेताच शाळांना सुट्या देण्यात आल्या. आज सहा ते सात महिन्यांचा कालावधी गेला तरी शाळा मात्र सुरु झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये.यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन क्लास सुरु केले. मात्र अनेक गावांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही, विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत. अशा अडचणींचा विद्यार्थ्यांना सामाना करावा लागतो आहे. ज्या शिक्षणाचे नुकसान होतेय असे नाव पुढे करत सर्व खटाटोप शिक्षण विभाग करत असून, मुलं ऑनलाइन शिकत आहेत असा दावा सरकार करत आहे.परंतु प्रत्यक्षात मात्र कुणी फोनसाठी तर कुणी पाण्यात वाहून गेलेल्या शेतमालासाठी पुन्हा मुलं शेतात राबत आहेत. ऑनलाइन शिकवलेले मुलांना नीट समजत नाही. त्यामुळे पाच दहा टक्के सोडले तर गावातील मुलं ऑनलाइन क्लास करत नाही. असेही दिव्य मराठीशी बोलतांना पालकांनी सांगितले.

गंगापूर मुधील घेवधानोरा येथे प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषद शाळा आहे. आपली मुलं शिकून मोठी व्हावीत हे सर्वच पालकांच स्वप्न असत. परंतु गावात सुविधा नाहीत, शाळा बंद आहेत. स्मार्ट फोन ज्या मुलांकडे आहे. त्यांना नेटवर्क मिळत नाही. खरं तर मुलांना समजत नसल्याने कोणत्या ना कोणत्या बहान्याने मुलं शेतात येत असल्याचेही पालकांनी सांगितले. खरं तर ऑनलाइन शिकवण्यापेक्षा मुलांना शाळेत बोलवूनच शिकवा अशी इच्छा अनेक पालकांनी व्यक्त केली आहे.

मुलांना शाळेत बोलवूनच शिकवा

गावात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. ऑनलाइन क्लास कोरोनामुळे सुरु केले. शाळा बंद आहे. पण मुलांना ऑनलाइन काहीच समजत नाही. पोर शेतात येतात. अनेक अडचणी आहेत. स्मार्ट फोन नाही, इंटरनेटच्या अडचणी आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव शहरासारखा नाही.तेंव्हा ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या पाहिजे जेने करुन मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.त्यांच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या शैक्षणिक सुरक्षेची देखील काळजी वाटते.- भाऊसाहेब शेळके, पालक.

स्मार्ट फोन का काय तो न्हाय

घरात तीन पोर आहे. प्रत्येकाला स्मार्ट फोन कुठून आणायचा. एकाच वेळी तीघांचा वर्ग. त्यात इंटरनेटची सुविधा नाही. पावसान शेतीच नुकसान झालं आहे. ऑनलाइन क्लास होतो पण मुलांना समजायला अवघड जात.-रक्माबाई जाधव, पालक.

बातम्या आणखी आहेत...