आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपचे माजी मंत्री गौतम यांची केजरीवालांना हाक:मी राजीनामा दिला, पण फडणवीस-गडकरींचेही राजीनामे मागवायचे असते

डॉ. शेखर मगर | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांकडे मीच माझ्या विवेकानुसार मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पण राजीनामा मंजूर करताना त्यांनी भाजप नेतृत्वाकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याचीही मागणी करायला हवी होती. कारण हेच नेते दरवर्षी दीक्षाभूमीवर जाऊन पंचशील, त्रिशरण आणि २२ प्रतिज्ञांची देशाला गरज असल्याचे भाषणातून छातीठोकपणे सांगतात, अशी भावना दिल्लीच्या समाजकल्याण मंत्रिपदाचा राजीनामा देणारे राजेंद्रपाल गौतम यांनी व्यक्त केली. शनिवारी (१७ डिसेंबर) धम्मसंमेलनासाठी ते शहरात आले होते. त्या वेळी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘देशातील विषमता, अन्याय, पाखंड, अंधश्रद्धा, रूढीवादी परंपरा नाकारण्यासाठी याच प्रतिज्ञा महत्त्वाच्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात २२ प्रतिज्ञा घेतातच. पण गुजरात निवडणुकीमुळे ‘आप’ला टार्गेट केले होते. ५ ऑक्टोबरला कार्यक्रम झाला. ७ ऑक्टोबरला माझे व्हिडिओ व्हायरल केले गेले. ८ ऑक्टोबरला केजरीवालांची गुजरातमध्ये सभा होती. मी त्यांच्याशी चर्चा न करताच राजीनामा दिला. पण मंजूर करताना त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाणाऱ्या गडकरी, फडणवीस, आठवलेंच्या राजीनाम्याची मागणी भाजप नेत्यांकडे करायला हवी होती.

धर्मांतराच्या विरोधातच आहे

मिशन जयभीमच्या माध्यमातून आयुष्य धम्मप्रसारासाठीच रिझर्व्ह केले. १४ ऑक्टोबर २०२० रोजी पहिल्यांदा दीक्षाभूमीवर गेलो तेव्हाच भारत बौद्धमय करण्यासाठी काम करायचे ठरवलेे. २०२५ पर्यंत १० कोटी लोकांना बौद्ध धम्मात आणणार आहे. मी धर्मांतराच्या सक्त विरोधात आहे. नैतिकतेच्या मार्गावर लोकांना आणणे म्हणजे धम्मात आणणे होय.

व्यवसायाने वकील, १९८२ पासून सामाजिक चळवळीत

१९९३ पासून त्यांनी वकिली सुरू केली. २५ टक्के खटले मोफत लढले. माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून दिला. २५ नोव्हेंबर २०१४ रोजी लोकांच्या आग्रहाखातर ‘आप’चे सदस्यत्व स्वीकारले. एकच महिन्याने म्हणजे २५ डिसेंबर २०१४ रोजी केजरीवालांनी उमेदवारी घोषित केली. ७ फेब्रुवारी २०१५ रोजी पहिल्यांदा आमदार झाले. तत्पूर्वी इयत्ता नववीत बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित झाले. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भिक्खू संघाची भाषणे ऐकल्याने १९८२ पासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग. २३ सप्टेंबर १९८३ मध्ये डॉ. आंबेडकर जागृती मंचाची स्थापना केली. प्रत्येक वर्षी ४५० विद्यार्थ्यांना मोफत ट्यूशन दिले. १९८७ दरम्यान समता सैनिक दलात काम करण्यास सुरुवात केली.

बातम्या आणखी आहेत...