आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधाभास:माझ्या कपाळावर रिव्हॉल्व्हर रोखले, तरीही मीच आरोपी कसाॽ

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चिकलठाण्यातील चौधरी कॉलनी ते रामगिरीपर्यंत तीन टवाळखोरांनी हातात रिव्हॉल्व्हर घेऊन शनिवारी रात्री धिंगाणा घातला. रामगिरीवर उभ्या तरुणाला बेदम मारहाण करत कपाळावर रिव्हॉल्व्हर रोखले. मात्र, ते सर्वजण भांडण करत असल्याचा ठपका ठेवत सिडको पोलिसांनी जखमी तरुणालाही आरोपी केले. मात्र, मी तेथे उभा होतो. माझा भांडणाशी काहीही संबंध नाही. त्यांनी मला बेदम मारहाण करत माझ्या कपाळावर रिव्हॉल्व्हर रोखले. तरीही मी आरोपी कसा, असा प्रश्न शिवराज साबळे या तरुणाने उपस्थित केला आहे. मंगळवारी त्याने पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेऊन न्याय देण्याची विनंती केली.

एका बँकेत शिवराज एरिया सेल्स मॅनेजर आहे. त्याचा एक भाऊ कीर्तनकार आहे. तो म्हणाला, २५ जून रोजी मित्राला भेटण्यासाठी रामगिरी चौकात उभा होतो. तेव्हा विना क्रमांकाच्या मोपेडवर आलेल्या रिव्हॉल्व्हरधारक नीलेश सुदाम देहाडे (३२), निखिल विजयानंद आगलावे (१९, दोघेही रा. विनय कॉलनी), योगेश हेकाडे यांनी रिव्हॉल्व्हर काढून डोक्याला लावली. पैशाची मागणी करत इतरांनी मारहाण केली. अचानक फरशी डोक्यात मारून पाठीत अनेक वार केले. त्यानंतर देहाडेच्या भाच्याने खिशातून पैसे काढले. अंगावरून गाडी जावी या उद्देशाने रस्त्यावर फेकून दिले. मध्यस्थी करणाऱ्यांवरदेखील रिव्हॉल्व्हर रोखली.

आरोपींसोबत राजकीय पदाधिकारी असल्याचा संशय

हा सर्व प्रकार घडल्यानंतर सिडको पोलिसांनी जखमी शिवराजसोबत इतर चौघांना ताब्यात घेतले. ठाण्यात माझा एक शब्दही न ऐकता मला दंगलीच्या गुन्ह्यात आरोपी केले. आरोपींच्या पाठीशी राजकीय पदाधिकारी असल्याने माझी तक्रार घेतली नाही. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असून न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्याने केली आहे.