आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना बंड:मी शिवसेना सोडणार नाही : संदिपान भुमरे यांची महिती

पैठण4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारवर नाराज असलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार गुजरातच्या सुरतमध्ये दाखल आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यातील दोन मंत्री व मराठवाड्यातील काही आमदारांचा समावेश आहे. त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्वांचे फाेन “नॉट रिचेबल’ दाखवत असताना “दिव्य मराठी’ने रोजगार व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. यात त्यांनी “आपण शिवसेना कधीच सोडणार नाही, मी शिवसैनिक आहे,’ असे म्हटले. माझ्या फोन बंद नाही. मी नॉट रिचेबल नाही. तुमच्याशी फोनवर बोलतोय याचाच अर्थ माझा फोन सुरू आहे. आपण मंत्री एकनाथ शिंदेंसोबत आहात का? अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी मी एकीकडे व ते बाजूला दुसरीकडे आहेत, असे उत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...