आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादेत राज ठाकरे यांच्या सभेला काही तासच उरले असतानाच आता या सभेत गोंधळ घालणाऱ्यांची औरंगाबाद पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. औरंगाबादेत येताना भिम आर्मीचे अशोक कांबळे यांना ताब्यात घेतले असून अजून काही लोकांना ताब्यात घेतले जात आहे.
भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या संविधान भेट देणार असल्याचे म्हटले जात आहे. इतकच नाही तर राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या 16 अटींचे उल्लंघन केल्यास सभा उथळून लावू असा इशाराही देण्यात आला आहे. असे असतांना अशोक कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भीम आर्मी आणि अन्य काही संघटनांनी राज ठाकरे यांची सभा उथळून लावण्याचा इशारा दिला. त्याबाबत मनसे नेते अविनाश जाधव यांना विचारले असता, संविधानाचे स्वागत आहे. मात्र सभा उथळून लावण्याचा धमक्या किंवा प्रयत्न करत असाल तर आम्ही मरण्याची गरज नाही. तुम्ही या सभेत चिरडून मराल, असा देखील इशारा देण्यात आले आहे.
भोंगे आणि हिंदुत्वावर मांडणार राज ठाकरे भूमिका
राज ठाकरेंच्या होणाऱ्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी अगदी शेवटच्या क्षणी अटीशर्थींसह पररवानगी दिली आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांची सभेसाठी 16 अटी घातल्या आहेत. असे असले तरी राज ठाकरे यांच्या आजच्या सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे. असे असतांना राज ठाकरे सभेत काय बोलतील किंवा भोंगे काढण्याबाबत आणखी काही नवा निर्णय घेतील का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.