आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • I Worked With Atul Sawan's Father. When I Was Working, I Never Thought That Atul Save Would Enter Politics. But He Came Back, Became Minister Of State, Cabinet

अरे आमच्याकडेही पहा ना जरा.....:मंत्रिपद न मिळाल्याने संजय शिरसाट यांचा थयथयाट; म्हणाले -अतुल सावे मागून आले, कॅबिनेट मंत्री झाले

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''अतुल सावेंच्या वडिलांसोबत मी काम केले. मी काम करताना अतुल सावे राजकारणात कधी येतील हे मला वाटलं नव्हते. परंतु ते मागुन आले, राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्रीही झाले, सगळंच झालं...अरे आमच्याकडेही पहाना जरा...आज काल सिनीयरीटी काही उरली आहे की नाही'' असा सवालही शिंदे गटातील नाराज आमदार संजय शिरसाट यांनी केला.

औरंगाबादेतील एका कार्यक्रमात ते बोलत होते त्यावेळी त्यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याची खदखद व्यक्त केली. काही दिवसांपुर्वीही त्यांनी अशाच पद्धतीने शिंदे गटावर आपली जाहीर नाराजी ट्विटच्या माध्यमातून केली होती.

आधीही केले होते ट्विट

औरंगाबादेतील आमदार संजय शिरसाट यांनी नाराज असल्याबाबत एक सुचक ट्विट केले होते. त्या ट्विटनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर त्यांच्याशी दिपक केसरकर यांनी चर्चा करुन मंत्रीपदाचे आश्वासन दिले होते, त्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटबद्दल सारवासारव केली. होती. ते म्हणाले होते की, ''मी भावनेच्या भरात बोलून गेलो. पण स्पष्ट सांगतो की, हा सर्व माझ्या मोबाईलचा झालेला टेक्निकल प्राॅब्लेम आहे. मागची पोस्ट कशी पुन्हा फाॅरवर्ड झाली हे मला आता सांगता येणार नाही'' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

हे होते शिरसाटांचे ट्विट

आमदार संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झाला नाही. यामुळे ते नाराज होते. त्यातच त्यांनी शुक्रवारी रात्री एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंचा उल्लेख 'कुटुंबप्रमुख' म्हणून करून आपल्यापुढे ठाकरेंच्या गटात परतण्याचा मार्ग अजूनही खुला असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. 'आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपला समावेश झाला नाही, तर आपल्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत,' हेच त्यांनी या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

मग सांगितले तांत्रिक कारण

शिरसाट म्हणाले, आम्ही सर्वजण वारंवार उद्धव ठाकरे यांना सांगत होतो की, तुम्ही पक्षप्रमुख म्हणून राहा, सत्ता दुसऱ्यांच्या हाती सोपवा. ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते तर आज ही वेळ आली नसती. माझ्या मोबाईलमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे ही पोस्ट झाली त्याचे मी या काळात तरी समर्थन करणार नाही.

संजय शिरसाटांचे शिंदे गटातही बंड?:उध्‍दव ठाकरेंना संबोधले कुटूंबप्रमुख; काही वेळातच ट्विट केले डिलीट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

माझी नाराजी स्वाभाविक

शिरसाट म्हणाले, मी राजकारणात आहे मला पुढे जावे असे वाटते. माझी नाराजी स्वाभाविक आहे. त्याला मी नाकारू शकत नाही, पण त्यांनी माझी मनधरणी केली. आधीच तीन मंत्री आहेत पण त्यांना योग्य वाटले तर ते निर्णय घेतील. मला राजकारणात 38 वर्षे झाली. राजकारणात यावेळी मला संधी यायला हवी होती, लवकरच मला ती संधी मिळेल असेही सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...