आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार चषक क्रिकेट:आयकॉन हॉस्पिटल स्ट्रायकर्सने सान्या युनायटेडला हरवले ; सुफियान सामनावीर

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुवा फाउंडेशनतर्फे आयोजित आयजे क्रीडा महोत्सव अंतर्गत खासदार चषक क्रिकेट स्पर्धेत आयकॉन स्ट्रायकर्स संघाने विजय मिळवला. शुक्रवारी झालेल्या लढतीत आयकॉनने सान्या युनायटेडला १९ धावांनी पराभूत केले. सामन्यात सुफीयान अहमद (१९ धावा, ३ बळी) सामनावीर ठरला. सान्याचा हा सलग तिसरा पराभव ठरला.

नाणेफेक जिंकून सान्याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना आयकॉनने १५ षटकांत ९ बाद ११७ धावा उभारल्या. यात सलामीवीर सचिन शेडगेने एकाकी लढत देत सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार व १ षटकार खेचला. अष्टपैलू सुफियान अहमद १५ चेंडूंत २ चौकारांसह १९ धावा केल्या. सय्यद अब्दुल वाहिद २ धावांवर नाबाद राहिला. संघाला तब्बल २१ धावा अतिरिक्त मिळाल्या आहेत. सान्याकडून कर्णधार स्वप्निल चव्हाणने १४ धावा देत ३ गडी बाद केले. नितिन फुलानेने २७ धावांत ३ बळी घेतले. प्रविण क्षीरसागर आणि शुभम मोहित यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला टिपले.

सरफराज, सुफियान, वहिदच्या भेदक गोलंदाजीने सान्याला रोखले : प्रत्युत्तरात सान्या युनायटेड संघाचा डाव १३.५ षटकांत ९८ धावांवर संपुष्टात आला. मधुर पटेलने २६ चेंडूंत ५ चौकारांसह ३४ धावा केल्या. ऋषिकेश तरडेने १९ चेंडूंत ३४ धावा ठोकल्या. आयकॉनकडून सय्यद सरफराजने ९ धावा देत ३, सुफियान अहमदने १४ धावा देत ३ आणि वेगवान गोलंदाज सय्यद अब्दुल वहिदने १४ धावा देत ३ गडी बाद केले.

प्रदीप जगदाळेचे अर्धशतक दुसऱ्या सामन्यात हायटेक इन्फ्रा स्ट्रायकर्सने बॅटको युनायटेडवर २० धावांनी विजय मिळवला. प्रथम खेळताना हायटेकने १५ षटकांत ७ बाद १०४ धावा काढल्या. यात कर्णधार प्रदीप जगदाळेने ४५ चेंडूंत ६२ धावांची अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरात बॅटको संघ निर्धारित षटकांत ८ बाद अवघ्या ८४ धावा करु शकला. प्रदीप जगदाळे व इम्रानने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...