आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अनोखा उपक्रम:ई-आकारच्या माध्यमातून व्हिडिओ, चित्रांच्या मदतीने अंगणवाडीतील मुलांना अक्षर ओळखस

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचा हा राज्यातील पहिला प्रयोग असल्याचा दावा
Advertisement
Advertisement

बालवय म्हटलं की थोड मुडी आणि हट्टी. अंगवाडीत या छोट्या बच्चे कंपनीला बडबड गीत, खेळ खेेळाच्या माध्यमातून संस्कार करण्यात येतात. परंतु लॉकडाऊन आणि कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या अंगणवाड्या बंद आहेत. पण मुलांचे शिक्षण थांबू नये. यासाठी पूर्वी असलेल्या आकार उपक्रमाला आता ई-आकार असे नाव देवून घरातच अंगणवाडीत मिळणारे शिक्षण देण्याचा उपक्रम औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने सुरु केला आहे. छोटया छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून चिंटू प शब्दापासून घरात काय काय आहे. ससा आणि कासवाच्या शर्यतीतून काय शिकलो आपण आदी. अशा एकाहून एक गोष्टी गाणींच्या माध्यमातून मुलांना शिकवण्यासाठी आता अंगणवाडी आपल्या घरीच आणली आहे. या प्रयोगातून औरंगाबाद जि.प. ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद असल्याचे महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.

देशभरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम रद्द करत. गर्दी टाळण्यास सांगण्यात आले असून, फिजिकल डिस्टन्स पाळा असा नियम केला आहे. मात्र कोरोनामुळे विविध क्षेत्रावर परिणाम झाला आहे. याचा प्रभाव अंगणवाड्यांवर देखील झाला असून, कोविड १९ मुळे अंगणवाड्या बंद आहेत. अंगणवाडी सेविका असलेल्या ताई या ग्रामीण भागात अंगवाड्यांच्या माध्यमताून पूर्व प्राथमिक मुलांना शिकवण्याचे काम करत. परंतु लॉकडाऊनमुळे अंगणवाडीत सुरक्षेमुळे मुलांचे येणे बंद झाले. पण मुलांचे शिक्षण थांबवता कामा नये. ९० टक्के मुलांचा विकास हा वयाच्या सहा वर्षापर्यंत होत असतो. त्यामुळे मुलांचे नुकसान होवू नये. यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने दिल्लीच्या रॉकेट लर्निंग ग्रृपच्या माध्यमातून अंगवाडी आपल्या दारी या संकल्पनेतून ई-आकार हा उपक्रम सुरु केला आहे. त्यासाठी खास २२०० अंगणवाडी ताईंना प्रशिक्षण देण्यात आले असून, १० जून पासून ई- आकारला सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वीच अंगवाडीताईंना जिल्हा परिषदेने मोबाईल दिले आहेत. या स्मार्ट फोनचा वापर करत १८०० पालकांचे ग्रृप करण्यात आले आहेत. रोज सकाळी ११ वाजता एकाच वेळी जिल्हाभरातील सर्व अंगवाड्यांमध्ये असलेल्या पालकांच्या व्हाट्सअॅप ग्रृपवर छान छान गोष्टी, बडबड गीते, चित्र अपलोड करण्यात येणार असून, हे व्हिडिओ मुलांना दाखवून त्या पद्धतीची कृती करण्यास पालकांना सांगण्यात आले आहे. मुलांनी ते पाहून केलेल्या कृतीची माहिती व्हिडिओ पालकांनी पाठवल्यास त्यांना ई- कार्ड प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. असेही मिरकले म्हणाले.

ई- आकारच्या माध्यमातून संस्कार -

पहिली सहा वर्ष मुलांच्या विकासासाठी खूप महत्त्वाची आहेत. ९० टक्के मुलांचा मानसिक विकास याच वर्षात होतो. सध्या कोरोनामुळे अंगवाड्या बंद आहेत. अशा परिस्थितीत छोट्या मुलांना अंगवाडीत बोलवणे योग्य नाही. त्यामुळे आकार हा उपक्रम आता आम्ही डिजिटल स्वरुपात केला असून, अजिज मिर्झा यांच्या सहकार्यातून आम्ही घरीच राहून अंगणवाडीच पालक आणि मुलांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे. पॉकेट लर्निंग या माध्यमातून सुरु केले आहे. एक सेंट्रल नंबर देखील पालकांना देण्यात आला आहे. याची सुरुवात बुधवार पासून करत आहोत. मुलांचे शिक्षण थांबू नये हा या मागचा उद्देश आहे. डॉ.मंगेश गोंदवले मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद.

असे आहे आठवडयाचे वेळापत्रक

बुधवार - खेळ खेळत शिकणे, कविता ऐका आणि गा, संख्यासह मासे बनवा

गुरुवार - व्हिडिओच्या मदतीने गोल वस्तू ओळखणे, आपल्या घरात गोल गोष्टी शोधा, कागदावर आकार बनवा

शुक्रवार - कविता पाठ करा आणि हाताने समजावून सांगा, कथा ऐका आणि प्रश्नांवर विचार करा, मराठी अक्षर "प' आणि "फ' बनवा

शनिवार - भांड्यासह आकरांची रचना बनवू, बसा- उठा, इंग्रजी अक्षर    " ए ' बनवा

Advertisement
0