आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तनपान:आईने बाळाला स्तनपान केल्यास कर्करोगाचा धोका टळतो : डॉ. रोटे

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळासाठी आईचे दूध हे पूर्ण अन्न आहे. या दुधामुळे बाळाला वेगवेगळ्या प्रकारे हाेणाऱ्या संसर्गापासून राेखले जाते. आईच्या दुधात प्रतिजैविके असतात. त्यामुळे स्तनपानाचा आईलाही खूप फायदा हाेऊन कर्करोगाचा धोका टळतो. बाळाच्या जन्मानंतर अर्ध्या तासानंतर ते दोन वर्षांपर्यंत स्तनपान करावे, असा सल्ला घाटीच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी दिला. घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात जागतिक स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन सोमवारी रोटे यांच्या हस्ते झाले त्या वेळी त्या बाेलत हाेत्या.

हा सप्ताह ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या वेळी स्तनपानाविषयी माहिती देणाऱ्या पत्रकाचे विमोचन करण्यात आले. या वेळी विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. शिल्पा क्षीरसागर, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. विजय कल्याणकर, डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. रूपाली गायकवाड, डॉ. स्वाती बडगिरे, डॉ. अश्विनी पवार, डॉ. रेवती घायाळ, विमल केदारे आदींची उपस्थिती होती. स्तनपानविषयक पोस्टर स्पर्धाही घेतली. यातील विजेत्यांना पारितोषिक दिले.

बातम्या आणखी आहेत...