आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:नामांतराच्या प्रश्नावर काँग्रेस स्वाभिमानी असेल तर पाठिंबा काढावा : रामदास आठवले

नांदेड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धनंजय मुंडेंबाबत पवारांनी गंभीर विचार करण्याची गरज

औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये वाक््युद्ध सुरू आहे. शिवसेनेच्या वतीने “सामना’तून काँग्रेसवर उलटसुलट टीका होत आहे. काँग्रेसमध्ये जर स्वाभिमान असेल तर त्यांनी पाठिंबा काढावा, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

नांदेडमध्ये कामगार कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यानिमित्त ते नांदेड येथे आले होते. याप्रसंगी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपले म्हणणे मांडले. बिलोलीतील अत्याचारग्रस्त मुलीच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, १९९५-९९ पर्यंत राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेने औरंगाबादचे नामकरण केले नाही. आता मनपा निवडणुकीच्या तोंडावर नामांतराची भूमिका घेतली जात आहे. नामांतरापूर्वीच शिवसेनेकडून औरंगाबादचा संभाजीनगर असा केला जाणारा उल्लेख याेग्य नाही. संभाजी महाराजांच्या नावास रिपाइंचा विराेध नाही. पण, नामांतरास विराेध आहे. उलट औरंगाबादच्या विमानतळाला अजिंठा-वेरूळचे नाव द्यावे, अशी आमची मागणी आहे. तसेच मुंबई सेंट्रल स्टेशनलाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले पाहिजे. त्यांचे बालपण, शिक्षण याच ठिकाणी झाले आहे. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान होईल. आगामी मुंबई महापालिका निवडणूक रिपाइं भाजपसोबत लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणार असून रिपाइंच्या जागा वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईत महापौर भाजपचा झाला तर उपमहापौर हा रिपाइंचा असेल, तशी आमची चर्चा सुरू आहे. काँग्रेसने पाठिंबा काढल्यास आम्ही आमचे सरकार बनविण्यास तयार असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. रिपाइंचा यात जास्त सहभाग असेलही असे ते म्हणाले. दरम्यान, शिष्यवृत्तीची वाढ करण्यासंबंधीचे पत्र पंतप्रधान यांना दिले असून लवकरच यावर निर्णय होईल, असेही आठवले यांनी सांगितले. यावेळी रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

धनंजय मुंडेंबाबत पवारांनी गंभीर विचार करण्याची गरज

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेकडून करण्यात आलेल्या आरोपाने पक्षाची प्रतिमा खराब होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत गंभीर विचार करून त्यांना मंत्रिमंडळात ठेवायचे की नाही हे ठरवावे. त्यांच्यावर अन्याय व्हावा, अशीही इच्छा नाही. परंतु, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, अशी पवार यांची भूमिका असते. दरम्यान, अशा प्रकरणात पोलिसांनी महिलांच्या तक्रारीची नोंद करून घेतली पाहिजे, असेही केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...