आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाशी लढा:कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी गरज पडल्यास उपकरातुन निधी उपलब्ध करावा, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरोना उपाययोजनांबाबत घेतली आढावा बैठक

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना उपचार व प्रतिबंधात्मक उपायांसाठी प्रशासन तत्परतेने कार्य करत आहे. यात जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनाचेही कार्य उल्लेखनीय आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी कोणतीही त्रुटी राहता काम नये, गरज पडल्यास जिल्हा परिषद उपकरातुन निधी उपलब्ध करून द्यावा अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला केल्या. कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री सत्तार यांनी मंगळवारी (7 एप्रिल) जिल्हा परिषदेत बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे होत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चांगले कार्य करत असल्याचे ते म्हणाले. ग्रामपंचायतनिहाय 14व्या वित्त आयोग व ग्रामनिधी शिल्लक असलेल्या निधीचा आढावा घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक व स्वच्छतेच्या बाबींवर खर्च करण्यासाठी गरज पडल्यास जिल्हा परिषद उपकरातून निधी उपलब्ध करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या. ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना स्वच्छतेसाठी किट देणे, स्टरलायझेशनसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच कोरोना उपाययोजनासंदर्भात पर्यवेक्षणासाठी प्रत्येक तालुक्यास खातेप्रमुखांना समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात यावी असेही त्यांनी सुचविले आहे. बैठकीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, सीईओ डॉ. मंगेश गोंदवले, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे, बांधकाम व अर्थ सभापती किशोर बलांडे, अति. मु. का. अधिकारी संतोष कवडे, विवले अप्पासाहेब चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) शिरीष बनसोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांह्यासह इतर खातेप्रमुखांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...