आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रा. अविनाश डोळस प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त ओबीसी मेळावा व चिंतन शिबिराचे आयोजन वसंतराव नाईक महाविद्यालयात केले होते. ओबीसींनी ठाेस राजकीय भूमिका घेतल्यास देशाच्या राजकारणात मोठा बदल हाेईल, असा सूर ‘ओबीसी समाजासमोरील आव्हाने आणि उपाय’ यावरील चर्चासत्रातून पुढे अाला. ‘ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना : समस्या व उपाय’ या पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नितीन राठोड होते, तर ‘मंडल आयोग अंमलबजावणी : स्थिती आणि वस्तुस्थिती’ या दुसऱ्या सत्रात बारा बलुतेदार महासंघाचे कल्याण दळे उपस्थित हाेते. डॉ. संजय मून आणि डॉ. प्रकाश सिरसाट यांनी प्रास्ताविक केले. दोन्ही सत्रांचे सूत्रसंचालन प्रा. भारत सिरसाट यांनी केले. अाभार अमरदीप वानखडे यांनी मानले. या चिंतन शिबिराचा हा वृत्तांत.
आंबेडकरवाद्यांनी मोठ्या भावाची भूमिका पार पाडावी ओबीसींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरवाद्यांनी मोठ्या भावाची भूमिका पार पाडली पाहिजे, असे मत ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रमुख शब्बीर अन्सारी यांनी व्यक्त केले.
देशातील राज्यकर्ते संवेदनशील नसल्याने ओबीसींना न्याय नाही राज्यकर्ते संवेदनशील नाहीत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांचा कळवळा नाही. बोगस ओबीसींमुळे ओबीसींमधील वंचित घटकाला न्याय मिळत नाही, अशी भूमिका पत्रकार स.सो. खंडाळकर यांनी मांडली.
काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत काँग्रेस आणि भाजप ओबीसींसाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मंडल आयोग, जनगणना, आरक्षण याला दोन्ही पक्षांनी विरोध केला, असा आरोप भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे नेते सुदाम चिंचाणे यांनी केला.
व्यवस्था परिवर्तनासाठी लोकांना जागे करण्याची गरज ओबीसींना केवळ सत्तेपुरते जागे न करता व्यवस्था परिवर्तनासाठी जागे करण्याची गरज आहे. एकट्या ओबीसींमध्ये राजकारणाचे चित्र बदलण्याची ताकद आहे, असे के.ई. हरिदास यांनी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.