आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनगणनेचा मुद्दा मांडणार‎:संघटित झाल्यास नेत्यांना‎ ओबीसींकडे यावे लागेल‎

छत्रपती संभाजीनगर‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात ५२ टक्क्यांपेक्षा जास्त ओबीसी‎ समाज आहे. हा समाज विखुरलेला‎ आहे. त्यामुळे आमची जनगणना‎ करा, अशी मागणी त्यांना करावी‎ लागत आहे. इतर मागासवर्गीय‎ संघटित झाल्यास नेत्यांना‎ त्याच्याकडे यावे लागेल, असे‎ खासदार इम्तियाज जलील यांनी येथे‎ सांगितले.‎ भारतीय पिछडा (ओबीसी)‎ शोषित संघटनेच्या राज्य‎ अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते‎ बोलत होते. या वेळी स्वागताध्यक्ष‎ डाॅ. उज्ज्वला दहिफळे, संयोजक डॉ.‎ कालिदास भांगे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष‎ ज्ञानेश्वर गोरे आदी उपस्थित होते.‎ खासदार इम्तियाज जलील‎ म्हणाले की, सर्वसामान्यांचा व‎ ‘ओबीसीं’चा आवाज‎ उठवणाऱ्यालाच संसदेत पाठवा.‎

संसदेत अनेक खासदार बोलतच‎ नाहीत. जिल्ह्याचा खासदार म्हणून‎ आपण मला दिलेल्या निवेदनानुसार‎ ओबीसी जनगणनेचा मुद्दा मी संसदेत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मांडणार आहे. या देशातील‎ शोषितांना चांगल्या दर्जाचे शिक्षण‎ आरोग्यविषयक सुविधा मिळाल्या‎ पाहिजेत. स्वागताध्यक्ष डॉ.‎ दहिफळे म्हणाल्या की, स्वातंत्र्याच्या‎ अमृतमहोत्सवी वर्षातही या देशातील‎ भटके विमुक्त आणि ओबीसींना‎ मूलभूत सुविधा मिळत नाहीत.‎ आधार कार्ड मिळत नाही.‎ आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत‎ ही अत्यंत खेदाची बाब आहे.‎ ओबीसींची जातनिहाय जनगणना‎ झाल्याशिवाय त्यांना कुठल्या सुविधा‎ मिळतात की नाही याची माहिती‎ समोर येणार नाही.‎

बातम्या आणखी आहेत...