आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी आणणार:स्मार्ट सिटीतून 317 कोटींचे रस्ते शक्य नव्हते तर निविदा काढलीच का : सावे

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील १०८ रस्त्यांची कामे करण्यासाठी स्मार्ट सिटीचे तत्कालीन सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी ३१७ कोटींची निविदा काढली होती. मात्र आता नव्या सीईओंनी निधी नसल्याचे कारण देत ही कामे थांबवली. पैसेच नव्हते तर मग आधीच्या सीईओंनी निविदा काढल्याच कशा, असा सवाल सहकारमंत्री अतुल सावे यांनी उपस्थित केला आहे. मात्र आता आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करून आणू, अशी ग्वाहीही सावे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. शहरात रस्ते पाणी आणि उद्योग या त्रिसूत्रीवर आपण काम करणार असल्याचे ते म्हणाले.

सावे म्हणाले, ‘औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी २०१४ मध्ये आपण प्रथमत: विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांकडून निधी मंजूर करून आणला होता. या निधीतून कामेही झालीत. नंतर शंभर कोटींचा निधी मंजूर करून आणला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आले.यातून औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...