आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • If The Admission Is Given More Than The Capacity, The Action Should Not Be More Than The Eleventh Or The Twelfth Capacity; Order Of Aurangabad Deputy Director Of Education

क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिल्यास कारवाई:अकरावी असो वा बारावी क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश नको; औरंगाबाद शिक्षण उपसंचालकांचे आदेश

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागात अकरावी आणि बारावील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिले जातात. त्याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असते. यावर्षी शिक्षण विभागाने यावर लक्ष केंद्रीत केल्याचे सांगण्यात आले आहे . विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी वर्गात प्रवेश देणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांनी मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नये. जादा प्रवेश दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी सांगितले आहे.

याबरोबरच अकरावीतून बारावी प्रवेश घेताना उपसंचालक कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक नाही, असे शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केले. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्यास संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करू असेही स्पष्ट केले.

शहरासह, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी, पालक उपसंचालक कार्यालयात ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येत आहेत. अकरावी वर्गातून दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश हवा असेल तर उपसंचालकांचे प्रमाणपत्र हवे असे प्राचार्य, मुख्याध्यापक सांगत होते. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. यावर अखेर मुख्याध्यापक, प्राचार्यांना पत्र पाठवित उपसंचालकांनी याबाबत स्पष्ट केले. औरंगाबाद विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी म्हटले आहे, औरंगाबाद विभागातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालये यांना सूचित करण्यात येते की, आपल्या उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 11 वी वर्गात प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांनी दाखल्याची मागणी केल्यास प्रचलित नियमानुसार संबंधितास दाखला देण्याची कार्यवाही करावी. या प्रकरणी विद्यार्थ्यांना नाहरकत प्रमाणपत्र आणण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयास पाठवू नये. इयत्ता 11 वी वर्गातून दुसऱ्या महाविद्यालयातील 12 वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना या कार्यालयाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही याची नोंद घ्यावी. कार्यालयाची अशी कोणतीही अधिकृत भूमिका नसून तश्या आशयाचे कोणतेही परिपत्रक या कार्यालयाकडून निर्गमित केलेले नाही, असे स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...