आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद दौरा:केंद्राकडून हक्काचे जीएसटीचे पैसे मिळाले असते तर तातडीने मदत देता आली असती- उद्धव ठाकरे

उस्मानाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी जिल्ह्यातील काटगाव, अपसिंगा, कात्री आदी गावात भेट देऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी 'सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, तुम्ही धीर सोडू नका,' असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. हे शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशा मदतीबाबत या शासनाकडून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल. नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण होत आलेत, मदतीचे अंतिम कार्य मुबंईत युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच मदत केली जाईल,' अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील शेतकरी बांधवांना दिली. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी अपसिंगा येथील नुकसानग्रस्त तीन कुटुंबाना प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश सुपूर्त केले.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, मंत्री संदीपान भुमरे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास घाडगे पाटील, विभागीय सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्यासह शेतकरी व काटगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...