आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:नाशवंत फळे राज्य सरकारने खरेदी केल्यास केंद्र आर्थिक मदत करेल; केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी साधला राज्यातील फलोत्पादकांशी संवाद

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशा अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या

फळ बागायतदारांकडून नाशवंत फळांची खरेदी केल्यास त्यातून होणाऱ्या नुकसानीपोटी केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करेल, असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले. राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांसह भाजप नेत्यांशी त्यांनी गुरुवारी व्हीसीद्वारे संवाद साधला.  विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी सांगितले की, भाजप उपाध्यक्ष खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे व प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून ही व्हीसी झाली. त्यात आ. बागडे यांचाही सहभाग होता. राज्यातील आंबा, केळी, द्राक्ष, संत्री, मोसंबी, डाळिंब, चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या या वेळी मांडल्या. कोरोना महामारी आणि लाॅकडाऊनमुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. फळांची मागणी घटली आहे. हा नाशवंत कृषीमाल असल्याने त्याला त्वरित बाजारपेठ, कोल्ड स्टोअरेज तसेच राज्य सरकारकडून खरेदी करण्याची गरज आहे. ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशा अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. उत्पादन क्षेत्र ते मागणी क्षेत्र या दरम्यान ‘किसान ट्रेन’ लवकरच सुरू होत आहे, असेही त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. या व्हीसीत माजी आमदार हरिभाऊ जावळे, माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, माजी आमदार पाशा पटेल, प्रगत शेतकरी डॉ.भगवानराव कापसे, चिकू बागायतदार संघाचे रघुनाथ बारी, द्राक्ष बागायतदार सोपान कांचन, माजी आमदार आंबा उत्पादक अजित गोगटे आणि आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष विवेक भिडे आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...