आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआय प्रवेश नोंदणीला सुरुवात:अर्ज भरताना द्यावा लागेल सुरू असलेला मोबाईल नंबर

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने जाहिर करण्यात आला. या निकालानंतर औद्योगिकी शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयची ऑनलाईन प्रवेश नोंदणी आजपासून सुरु करण्यात आली आहे.

यंदा प्रवेश जलद आणि सुरुळीत होण्यासाठी शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व प्राचार्यांना ऑगस्ट 2022 सत्रातील आयटीआय प्रवेश प्रक्रियेबाबतची माहितीपुस्तिका, नियमावली व कार्यपद्धती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक आयटीआयवर विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी माहितीदर्शक फलक तसेच अन्य साधने वापरावीत अशा सूचना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आल्या आहेत.

मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत सध्या इंडस्ट्रीला प्रशिक्षित कारागिरांची मोठी गरज भासत आहे. त्यामुळे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या उत्तम संधी आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये आयटीआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशात वाढ होण्याच्या अनुषंगाने व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाने स्कूल कनेक्ट उपक्रम राबविला होता.

या उपक्रमातून दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयनंतर मिळणारी संधी, नोकरी, कौशल्य, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, रोजगारांची संधी आदींची माहिती दिली होती. तसेच आयटीआयनंतर अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षणाचा देखील पर्याय खुला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत, असे आवाहन संचालनालयातर्फे करण्यात आले होते.

अशी आहे औरंगाबादमधील प्रवेश क्षमता

औंरगाबाद रेल्वेस्टेशन येथे असलेल्या मुलांच्या आयटीआयमध्ये आठ युनिट 27 ट्रेड असून, याची प्रवेश क्षमता ही 12 हजार 800 आहे. तर मुलींच्या आयटीआयमध्ये 156 क्षमता आहे.

असा भरता येईल अर्ज

विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. तसेच आयटीआयमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्ज भरतांना विद्यार्थ्यांनी त्यांचा सुरु असलेला मोबाईल क्रमांक देणे अनिवार्य आहे. अर्ज भरण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी https://admission.dvet.gov.in संकेतस्थळावर पाहता येईल.

बातम्या आणखी आहेत...