आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष शेअर:तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास शेअरमध्ये फायदा ; एकनाथ रंगमंदिरात आयोजित परिषद

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बचत व गुंतवणूक एकाच अर्थाने घेण्याची भारतीय मानसिकता आहे. त्यामुळे सामान्य माणूस शेअर मार्केटपासून दूर राहिला. पण कोरोनाकाळात ऑनलाइन शेअर मार्केटिंगमधील सामान्य माणसाचे प्रमाण वाढले. आर्थिक साक्षरता म्हणजे श्रीमंत होणे नव्हे, तर संपन्न होणे. तुम्ही किती कमावता यापेक्षा किती गुंतवणूक करता हे महत्त्वाचे आहे. तसेच ज्ञान, कौशल्य व वृत्ती या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करून गुंतवणूक केल्यास शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा हाेतो. गुंतवणूक करताना सुरक्षितता, तरळता (लिक्विडिटी) आणि वाढ हे गुंतवणुकीचे महत्त्वाचे पिलर आहेत. त्यामुळे याकडे बारकाईने लक्ष द्या, असा सल्ला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे डॉ. अनिल जाधव यांनी दिला. वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि पब्लिक असेट मॅनेजमेंटतर्फे शुक्रवारी संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित परिषदेत शेअर आणि गुंतवणूक या विषयावर ते बोलत होते. या वेळी मंचावर औरंगाबाद विभागाचे पोस्ट मास्टर जनरल अदनान अहेमद, इन्कम टॅक्स विभागाचे अतिरिक्त आयुक्त किरण देशपांडे, पोस्टल सेवांचे संचालक अभिजित बनसोडे, केव्हीएन असोसिएटचे चारुदत्त देशपांडे, बिझनेस डेव्हलपमेंट व्यवस्थापक प्रभुधर लीलादास, इन्व्हेस्टमेंट बँकिंग शाखेचे उपाध्यक्ष अभय अग्रवाल, एनएसईचे अय्युब मोहंमद, सी. ए. पारस गंगवाणी, महाराष्ट्र बँकेचे अंचल प्रबंधक महेश डांगे यांची उपस्थिती होती. पारस गांगवाणी म्हणाले, भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थसत्ता आहे. भारतात मागील ८ वर्षांत मार्केटबद्दलचे विचार वेगाने बदलत आहेत. आजवरचा इतिहास पाहता आपण सातत्याने विकास करतो. आगामी काळात केमिकल इंडस्ट्री वेगाने वाढणार आहे. आज आयटी क्षेत्रात तेजी आहे, तीच उद्या केमिकल क्षेत्रात दिसणार आहे, असे पारस यांनी सांगितले. अदनान अहमद म्हणाले, पोस्टाच्या अनेकविध गुंतवणूक योजना आहेत, ज्यामुळे लोकांना खूप फायदा होतो. पोस्टाच्या योजनांचे जाळे मोठे आहे. भारतीय लोकांना बचतीचा कानमंत्र बालपणापासूनच मिळालेला आहे. पण गुंतवणुकीबाबत आपण कायम साशंक असतो. आर्थिक साक्षरता झाली तर गुंतवणूकही भारतीयांचा टक्का वाढेल. त्यामुळे गुंतवणुकीवरिल विविध पुस्तकांचे वाचन करा, असा सल्ला त्यांनी दिला. मंगेश केदार यांनी सूत्रसंचालन केले. डीएलसीसी समन्वयक डांगे यांनी आभार मानले.

राजगोपाल मालपाणी यांनी मांडलेल्या सूचना {आर्थिक साक्षरता शिक्षण मातृभाषेतून द्यावे. शाळा, महाविद्यालयात गुंतवणूक विषय प्रत्येक शाखेला अनिवार्य करावा. यातून गुंतवणूक वाढेल. { शेअर मार्केटसंदर्भातील तक्रारींचा निपटारा स्थानिक स्तरावर झाला पाहिजे. कारण दिल्लीत सातत्याने जाणे सामान्य व्यक्तीला शक्य नाही. त्यामुळे लोक गुंतवणूक करण्यास घाबरतात. त्यांच्या समस्यांचे निराकरण स्थानिक स्तरावर व्हावे. { गुंतवणुकीच्या विविध योजना शासन आणते, पण त्या सर्वसामान्य पोहोचवण्यासाठी सक्षम माध्यम किंवा केंद्र नसल्याने गुंतवणुकीचा पारंपरिक पर्याय बहुतांश भारतीय घेतात.

बातम्या आणखी आहेत...