आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:इग्नूच्या प्रवेशातही विद्यार्थ्यांची प्रोफेशनल कोर्सेसलाच गर्दी; मंगळवारपासून नव्या सत्राचे प्रवेश

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात इग्नूच्या प्रवेश प्रक्रियेला (10 मे) मंगळवारपासून सुरूवात होत आहे. पारंपारिक अभ्यासक्रमांच्या तुलेनत रोजगार देणाऱ्या किंबहुना पदोन्नती देणाऱ्या व्यवसायिक अभ्यासक्रमांनाच विद्यार्थी पसंती देत असल्याची माहिती आहे.

मागील वर्षी राज्यशास्त्र, इंग्रजी आणि इतिहासच्या तुलनेत एमबीए, एमसीए आणि एमएसडब्ल्युला प्रवेश घेण्याचा कल दिसून आला होता. यंदाही विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी हाच ट्रेंड असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

प्रादेशिक विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अधिक असते हे तर सर्वश्रृतच आहे. तिथेही आता पारंपारिक अभ्यासक्रमांना विद्यार्थी बगल देताना दिसत आहेत. अगदी त्याच प्रमाणे बहिस्थ कोर्सेसलाही विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येते आहे. छत्रपती संभाजीनगर मधील विवेकानंद महाविद्यालयात इग्नुचे केंद्र आहे.

येथे दिसून आलेल्या ट्रेण्डनुसार एकूण पदवीच्या प्रवेश क्षमतेमध्ये बीए ऑनर्समध्ये मानसशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र आणि इंग्रजीला 50 टक्के प्रवेश घेतात. तर पारंपारिक अभ्यासक्रमांनाही 50 टक्के प्रवेश घेतात. तर एम.ए. मध्ये विद्यार्थी संख्येच्या एकूण पदवी आणि पद्युत्तरसाठी मयार्दा नाही परंतु सद्यस्थिती पीजी आणि युजीमध्ये 200-200 या एकूण क्षमतेमध्ये 50 टक्केहून अधिक मानसशास्त्र, एमएसडबल्यू आणि एमबीएला तरुण प्राधान्य देत आहेत. उर्वरित एम.ए.च्या विषयांना 25 टक्के तरुण प्रवेश घेत असल्याचे प्रवेश समन्वयकांनी सांगितले.

शिवाय इग्नुचा अभ्यासक्रम हा एमपीएससी, युपीएससीच्या धरतीवर असल्याने तरुणांना त्याचा जास्त फायदा होतो. छत्रपती संभाजीनगर मधील स्टडी सेंटरमध्ये 45 हून अधिक कोर्सेस आहेत. ज्यात तरुण थेट प्रवेश घेवू शकतात. 10 मे पासून ही नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे.

इग्नु स्टडी सेंटर समन्वयक नागनाथ तोटावाड म्हणाले की, कोविडनंतर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अभ्यासक्रमासह अन्य कोर्सेस जसे की मानसशास्त्र, समाजशास्त्र , एमबीए आणि रुरल डेव्हल्पमेंट सारख्या कोर्सेस आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांनाही तरुण प्रवेश घेण्यास पसंती देत आहेत.

ऑनलाइन आणि ऑफलाइन अभ्यासक्रमसाठी साहित्य उपल्बध

कला, इंग्रजी आणि पर्यटन अध्ययन, बीसीए सामाजिक कार्य, डिप्लोमा अभ्यासक्रम, डिप्लोमा इन क्रिएटिव रायटिंग, लहान मुलांची देखभाल आदी कोर्सेसह या अभ्यासक्रमांचे साहित्य ऑनलाइन आणि ऑफलाइन साहित्य उपलब्ध करुन इग्नु उपलब्ध करुन देत असल्याचेही समन्वयकांनी सांगितले.

या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांनाही घेता येईल प्रवेश

आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण अध्ययन, खाद्य आणि पोषण मार्गदर्शन प्रमाणपत्र, एचआयवी आणि परिवार शिक्षा प्रमाणपत्र, सूचना प्रौद्योगिकी, उपभोक्ता संरक्षण पोषण आणि चाइल्ड केअर, पर्यटन अध्ययन, विजुअल आर्ट्स, ग्रामीण विकास आदी प्रामणपत्र अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेता येईल.