आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे अभ्यासक्रम:नव्या शैक्षणिक सत्रापासून इग्नूत चार नवे अभ्यासक्रम

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या नव्या शैक्षणिक सत्रात प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा चार नव्या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात येत आहे. याबरोबरच एआयसीटीने इग्नूअंतर्गत एमबीएसाठी देशभरातील १ लाख, तर एमसीएसाठी २० हजारहून अधिक जागा वाढवण्याची मान्यता दिली असल्याची माहिती गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सहायक प्रादेशिक संचालक डॉ. सौनंद सोमासी यांनी दिली.

डॉ. सोमासी यांनी सांगितले की, यंदा एमए अर्बन प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट अर्बन स्टडीज, एमए सीएसआर, एमए पर्यावरणीय आरोग्य, एमए शाश्वत विज्ञान हे चार नवे अभ्यासक्रम सुरू होत आहेत. कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. बारामती येथे फूड सेफ्टी अँड क्वालिटी विषयही सुरू करण्यात आला आहे. लवकरच याची सुरुवात अन्य इग्नू केंद्रांतही होईल. यंदा एमबीए, एमसीएच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. एआयसीटीईने जागा वाढवण्याला मंजुरी दिली. देशभरात एमबीएच्या एक लाख, तर एमसीएच्या २ हजारहून अधिक जागा वाढणार आहेत. इग्नू अभ्यासक्रम तयार करण्याबरेाबरच गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रमाचे साहित्यही उपलब्ध करून देत आहोत. आता एमबीएसाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार नाही. या वेळी प्रो. कनिज फातेमा, डॉ. नवीद उस-सहर, डॉ. सोहेल जकियोद्दीन, डॉ. फहीमीना नाज तसेच मराठवाडा कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...