आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10, 11 डिसेंबर रोजी आयोजन:चितेगावात 300 एकर जागेत इज्तेमा, 1 लाख लोक येणार ; 25 एकरात उभारला भव्य मंडप

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चितेगावात १०, ११ डिसेंबर राेजी हाेणाऱ्या तब्लीगी इज्तेमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरराेज चार ते पाच हजार स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. एकूण ३०० एकर जागेपैकी २५ एकरांत भव्य मंडप उभारण्यात आला आहे. यात साधारण एक लाख लोक बसू शकतील. शनिवारी सकाळी ६ वाजता फजरच्या नमाजनंतर इज्तेमाला सुरुवात होणार आहे.

लिंबेजळगाव येथे २०१८ मध्ये राज्यस्तरीय त्यानंतर २०१९ ला करमाडला जिल्हास्तरीय इज्तेमा झाला होता. त्यानंतर कोरोनामुळे मध्यल्या दोन वर्षांत खंड पडला होता. आता राज्यात जिल्हानिहाय इज्तेमा सुरू झाले आहेत. चितेगावातील इज्तेमासाठी २५ ते ३० शेतकऱ्यांनी ३०० एकर जमिन उपलब्ध करून दिली आहे. या जमिनीचे सपाटीकरण, मंडप, पार्किंग, हॉटेल्स, रुग्णालय, वजूखाने, स्वच्छतागृहांची उभारणी झाली आहे. गेल्या एक महिन्यांपासून दररोज चार ते पाच हजार स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. इज्तेमास्थळी येण्यासाठी चार मोठे रस्ते आणि बारा ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. दिल्ली, पुणे येथील मुस्लिम धर्मगुरूंचे मार्गदर्शन होणार आहे.

मंडपात औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय लोकांची बसण्याची व्यवस्था असेल. मंडपमधील शेवटच्या भाविकास प्रवचन स्पष्टपणे ऐकू येईल, असे स्पीकर लावले आहेत. शनिवार, रविवारी १० हजार स्वयंसेवक भाविकांच्या मदतीसाठी तैनात राहणार आहेत.

{सामूहिक विवाह सोहळा : इज्तेमाच्या शेवटच्या दिवशी ११ डिसेंबरला सायंकाळी दुआच्या आधी ३०० ते ४०० जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा होईल, असा अंदाज आहे. इज्तेमाच्या समारोपानंतर जिल्हाभरातून आलेल्या एक हजार “जमात’ येथून मार्गस्थ होतील.

१० हजार स्वयंसेवक मदतीला, १२ ठिकाणी पार्किंग {पार्किंग : इज्तेमाच्या चारही बाजूने १२ ठिकाणी दुचाकी, चारचाकी, रिक्षा, अवजड वाहनांच्या पार्किंगची सोय. औरंगाबाद ते चितेगावदरम्यान १० हजार स्वयंसेवक लोकांना मदत करतील. {रस्ते : इज्तेमास्थळी येण्यासाठी चार मोठे रस्ते तयार. {हॉटेल : ३० रुपयांत जेवण मिळेल. यासाठी १३ मोठे व ३५० लहान हॉटेल्स उभारण्यात येत आहेत. चहा, नाष्ट्याचीही सोय. {हॉस्पिटल : एक हॉस्पिटल, आयसीयू, रुग्णवाहिका तैनात. {पाणीपुरवठा : एमआयडीसीकडून पुरावठा, त्याशिवाय प्रत्येकी ६० लाख लिटर क्षमतेचे दोन शेततळे, विहिरी आणि टँकरची सोय. {वीज : महावितरणकडून चार रोहित्र घेतले आहेत. जागोजागी ट्यूबलाइट लावून विजेची व्यवस्था. {वजूखाने : २ हजार वजूखाने, २ हजार स्वच्छतागृहे. {वाहनांची दुरुस्ती : चारही रस्त्यांवर दुचाकी, कार पंक्चर झाल्यास, बिघडल्यास मोफत दुरुस्तीसाठी मेकॅनिक तैनात.

बातम्या आणखी आहेत...